|Saturday, May 25, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » शिक्षेविरोधात राम रहीमची उच्च न्यायालयात धाव

शिक्षेविरोधात राम रहीमची उच्च न्यायालयात धाव 

चंदीगढ

 गुरमीत राम रहीमने बलात्काराच्या गुह्याप्रकरणी झालेल्या 20 वर्षांच्या शिक्षेविरोधात पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात दाद मागितली. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोन साध्वींवर बलात्कार केल्याच्या गुह्यासाठी रहीमला 20 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. डेरा सच्चा सौदाचा प्रमुख असणाऱया राम रहीमला दोषी ठरविण्यात आल्यानंतर पंचकूला आणि हरियाणाच्या उर्वरित शहरांमध्ये हिंसाचार फैलावला होता. या हिंसाचारात 20 पेक्षा अधिक जण मारले गेले. तसेच हजारो कोटींच्या संपत्तीचे नुकसान झाले. या हिंसाचारावेळी प्रशासनाच्या भूमिकेवरून अनेक आरोप झाले. हिंसाचाराच्या प्रकरणी डेऱयाच्या अनेक पदाधिकाऱयांना अटक करण्यात आली. हा हिंसाचार कट रचत घडवून आणल्याचे चौकशीत उघड झाले. राम रहीमची मुख्य सहकारी हनीप्रीत सध्या फरार असून तिचा युद्धपातळीवर शोध घेतला जातोय. ती नेपाळमध्ये लपून बसल्याचा संशय आहे.

Related posts: