|Thursday, July 18, 2019
You are here: Home » विविधा » तो बुडत होता, मित्र सेल्फी काढण्यात दंग

तो बुडत होता, मित्र सेल्फी काढण्यात दंग 

ऑनलाईन टीम / बंगळुरू :

कर्नाटकची राजधानी बंगळुरूजवळच्या रामनगर जिह्यातील एनसीसी कॅम्पसाठी गेलेल्या विद्यार्थ्याच्या तलावात बुडून मृत्यू झाला आहे. मात्र यामागील धक्कादायक बाब अशी की हा विद्यार्थी बुडत असताना त्याच्यासोबत गेलेले त्याचे मित्र सेल्फी काढण्यात दंग होते.

या विद्यार्थ्याचे नाव विश्वास असून तो बंगळुरू जवळच्या जयानगरमध्ये असलेल्या नॅशनल कॉलेजचा विद्यार्थी असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉलेजच्या 25 विद्यार्थ्यांचा एक गट एनसीसी अंतर्गत ट्रेकिंग कॅम्पवर गेला होता. दरम्यान काही विद्यार्थी शिक्षकांची परवानगी घेऊन जवळच्या तलावात आंघोळीसाठी गेले होते. याप्रकरणी रामनगरचे पोलीस अधीक्षक रमेश भनोट यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांनी तलावाबाहेर धोक्याचा इशारा देण्यासाठी लावलेल्या बोर्डकडे लक्ष दिले नाही. तलावात उडी मारत पोहणे सुरू केले. विश्वासला पोहताना दम लागल्याने तो बुडू लागला. मात्र धक्कादायक म्हणजे विश्वास बुडाल्याचा पत्ता मुलांना ते तलावातून बाहेर आल्यावर लागला. हा संपूर्ण प्रकार विद्यार्थ्यांनी किनाऱयावर काढलेल्या सेल्फीमध्ये कैद झाला आहे.