|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सातारा जिह्यातील रखडलेल्या पाणीपुरवठा योजना मार्गी लावा

सातारा जिह्यातील रखडलेल्या पाणीपुरवठा योजना मार्गी लावा 

प्रतिनिधी/ मुंबई

सातारा जिह्यात राष्ट्रीय पेयजल योजना व मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत अनेक पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. या सर्व योजना तातडीने पूर्ण करून त्वरित पाणीपुरवठा सुरू करावा, असे निर्देश स्वच्छता व पाणीपुरवठा राज्यमंत्री तथा सातारा सहपालकमंत्री श्री.सदाभाऊ खोत यांनी आज दिले.

सातारा जिह्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडील ग्रामीण व नागरी(पी.एम.सी.)सह तसेच जिल्हा परिषदेकडील मागील 3 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या रखडलेल्या पाणीपुरवठा योजना, प्रगतीपथावरील योजना व प्रस्तावित नळ पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यासाठी स्वच्छता व पाणीपुरवठा राज्यमंत्री श्री.सदाभाऊ खोत यांच्या दालनात बैठक आयोजित केली होती. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

      बैठकीत राज्यमंत्री श्री.खोत यांनी. सर्व योजनांचा आढावा घेवून विविध योजनेअंतर्गत प्रस्तावित योजनेपैकी टंचाईग्रस्त गावातील 73 योजना प्राधान्याने मार्गी लावण्याचे निर्देश दिले. त्याच प्रमाणे योजना राबविताना स्थानिक लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या सूचना आणि शिफारसी यांचा देखील विचार अधिकायांनी करावा, असे श्री.खोत यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी व विजमंडळाच्या अधिकायांसोबत पुढील आठवडय़ात बैठक

     रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांना निधी कसा उपलब्ध करून देता येईल. यासाठी सातारा जिल्हाधिकायांसोबत आणि पाणीपुरवठा योजनांना वीज मंडळाकडून वीजपुरवठा केला गेला नाही, त्यासाठी विजमंडळाच्या अधिकायांची पुढील आठवडय़ात बैठक बोलवावी. असे निर्देश कृषि राज्यमंत्री तथा सातारा सहपालकमंत्री श्री.सदाभाऊ खोत यांनी दिले.