|Tuesday, June 19, 2018
You are here: Home » Top News » इन्क्युबेटर तापल्याने नवजात बालकाचा मृत्यू

इन्क्युबेटर तापल्याने नवजात बालकाचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / पुणे :

इन्क्युबेटरचे तापमान प्रमाणाबाहेर वाढल्यामुळे गंभीररित्या भाजलेल्या नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. बुधवार पेठेतील वात्सल्य मॅटनिर्टी होममध्ये ही घटना घडली आहे. या घटनेविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाळाचे वडील विजयेंद्र कदम हे रिक्षाचालक आहेत. विजयेंद आणि स्वाती कदम या दाम्पत्याला मुलगी झाली. स्वाती यांचे सिझर झाल्यानंतर बाळाला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्याला इन्क्युबेटमध्ये ठेवण्यात आले होते. मंगळवारी सकाळी इन्क्युबेटरमधील तापमान वाढल्यामुळे बाळ 80 टक्के भाजले होते. त्यानंतर बाळावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मात्र बुधवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

 

Related posts: