|Friday, October 19, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » मृत्यू नंतरचे जीवन

मृत्यू नंतरचे जीवन 

मन चिंती ते वैरीही न चिंती, असे म्हणतात. आपल्या वैऱयाच्याही मनात जे विचार येणार नाहीत ते आपल्या नाशाचे विचार आपल्याच मनात थैमान घालत असतात. एकप्रकारे आपणच आपली कबर खोदत असतो. वास्तविक ज्या मृत्यूच्या विचारापासून आपण सातत्याने दूर पळत असतो तेच विचार आपल्या मनात थैमान का घालू लागावेत?

मृत्यूपासून दूर पळण्याचा आपण प्रयत्न का करतो, याची मानसशास्त्रीय कारणे काय आहेत याचा जगभर सातत्याने अभ्यास केला जातो. या रहस्यमय विषयाचे आज उपलब्ध असलेले संशोधन खूप रंजक आहे. जीवनाची मूलभूत प्रेरणाच मुळी जगणे, जिवंत राहणे ही आहे. या जगातील एक प्रजाती दुसऱया प्रजातीचे भक्ष्य आहे. हरण गवत खाते. हरणाला वाघ खातो. असे चक्र निसर्गात चालूच असते. या जीवन संघर्षात जी  प्रजाती बलवान ठरते ती जगते, जी दुबळी ठरते ती नष्ट होते, असे डार्वीन सांगतो. ग्tिtाst sल्rन्ग्न हा तगून राहण्याचा मूलभूत नियम आहे. त्यामुळे जिगीषा, जिवंत राहण्याची मनाची इच्छा ही मानवी मनाची मूलभूत प्रेरणा बनली आहे.

ही प्रेरणा किती प्रबळ असते? मृत्यूनंतर सारे काही संपते, आपले अस्तित्व शिल्लक राहत नाही, हे स्वीकारायला आपण तयार असतो का? डॉ. मॅरिओ गॅरीट यांनी अलीकडेच सादर केलेले संशोधन काय सांगते पहा. डॉ. गॅरीट यांनी युवकांची-मृत्यूनंतरचे जीवन-याविषयी मते काय आहेत याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी बऱयाच युवकांशी संवाद साधून त्यांनी त्यांची मते संकलित केली. डॉ. गॅरीट यांना असे आढळून आले की 18 ते 29 वयोगटातील जवळ जवळ 5 पैकी 4 (म्हणजे 80 टक्के) युवकांचा मृत्यूनंतरच्या जीवन अस्तित्वावर विश्वास आहे. गंमत म्हणजे यापैकी अनेक युवकांचा देवाच्या अस्तित्वावर विश्वास नव्हता. अनेक युवक असे मानत होते की बायबल हा धर्मग्रंथ नसून परिकथांचे पुस्तक आहे. यापैकी अनेक युवक त्यांना समजायला लागल्यापासून कधी चर्चची पायरीही चढले नव्हते किंवा त्यांनी कधीही देवाची प्रार्थना केली नव्हती. पण आपल्या अमरत्वावर त्यांचा विश्वास आहे आणि मृत्यूबरोबरच आपले सारे अस्तित्व संपते यावर विश्वास ठेवायला ते तयार नाहीत. पाश्चात्य देशातील युवकांचे मन अशाप्रकारे विचार करत असेल तर आपल्या देशातील बहुसंख्य लोकांचे मन या समस्येचा कसा विचार करत असेल हे वेगळे सांगायला नको. आपल्याला मृत्यू प्रत्यक्षात नको असतो म्हणून आपण कल्पनेचेही अनेक खेळ मनाने खेळतो. मृत व्यक्तीचे नाव त्याच्याच कुटुंबातील नवजात अर्भकाला का दिले जाते? त्यामागे कोणती मानसिकता असते? प्रत्यक्षात ती व्यक्ती दिसली नाही, भेटली नाही तरी श्राद्ध, पुण्यतिथी, स्मृतिदिन यांच्याद्वारे किंवा स्मारक उभे करून आपल्या मनाच्या स्मृतीच्या कप्प्यात तरी त्या व्यक्तीला कायम अमर करण्याचा प्रयत्न आपण करीत नाही काय?

Related posts: