|Sunday, August 25, 2019
You are here: Home » उद्योग » एअरटेलकडून 22 हजार कोटीची गुंतवणूक

एअरटेलकडून 22 हजार कोटीची गुंतवणूक 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी भारती एअरटेल यंदा 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे, असे कंपनीचे प्रमुख सुनिल भारती मित्तल यांनी सांगितले. भारतातील बदलत्या तंत्रज्ञानानुसार या क्षेत्राच्या वाढीला मोठी संधी आहे. राज्ये आणि महापालिकांना डिजिटल इंडियाचे सामर्थ्य ओळखत मदत करावी असे त्यांनी आवाहन केले.

एअरटेलकडून 18 ते 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येईल. डिजिटल पायाभूत सुविधा निर्मितीसाठी या क्षेत्राकडून 50 ते 60 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येईल. कंपनीकडून लवकरच मल्टिपल इनपुट मल्टिपल आऊट तंत्रज्ञान सुरू करण्यात येणार आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील सेवा देशात मिळण्यास मदत होईल. भविष्यातील स्वयंचलित कार, उडत्या कार, कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा वापर लवकरच तंत्रज्ञान क्षेत्रात दिसून येईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. मोबाईल इंडिया कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते.