|Saturday, August 24, 2019
You are here: Home » विविधा » आता लवकरच पेट्रोल- डिझेलचीही होम डिलीव्हरी

आता लवकरच पेट्रोल- डिझेलचीही होम डिलीव्हरी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पेट्रोल भरण्यासाठी आता पेट्रोल पंपावर जाऊद लांबाच लांब रांगा लावण्याची गरज भासणार नाही कारण आता लवकरच पेट्रोलियम पदार्थ ई – कॉमर्स संकेतस्थळांवर उपलब्ध होणार असल्याची माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे.

पेट्रोलियम पदार्थ ई – कॉमर्स संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या मिळाल्या असल्याचेही धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. ‘सुरूवातीला जेव्हा मी या संकल्पनेबद्दल बोललो, तेव्हा असे काही होऊ शकते याबद्दल अनेकांका शंका होती. अनेकांनी ही संकल्पना प्रत्यक्षात येईल की नाही, याबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. पण आता ही संकल्पना लवकरच सत्यात उतरणार आहे, असे धर्मेद्र प्रधान यांनी सांगितले आहे. दिल्लीत झालेल्या इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये ते बोलत होते. सगळय़ात आधी ही संकल्पना 21 एप्रिलला श्रीनगरमध्ये संसदेच्या सल्लागार समितीच्या बैठकीत मांडण्यात आली होती.