|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » leadingnews » यशवंत सिन्हा राष्ट्रदोही ठरवले जातील : शिवसेना

यशवंत सिन्हा राष्ट्रदोही ठरवले जातील : शिवसेना 

ऑनलाईन टीम / मुंबई :

देशभरातील जनतेने गरिबीचा अनुभव घ्यावा यासाठी पंतप्रधनांचे अर्थमंत्र मेहनत घेत आहेत, असे यशवंत सिन्हा यांनी म्हटले आहे. हे वास्तव आम्ही वर्षभरापूर्वीच सांगितले होते. तेव्हा आम्ही देशद्राही ठरलो होतो, आता यशवंत सिन्हा बेईमान किंवा राष्ट्रदोही ठरवले जातील, अशी टीका शिवसेनेने सरकारवर केली आहे.

विकासाबाबत काहींनी पुष्कळ थापा मारल्याने विकास वेडा झाला असावा, अशी शहाणपणाची टिप्पणी राहूल गांधी यांनी केल्याची दाद देत, सेनेही त्यांच्या सुरात सुर मिसळत ‘विकास गांडो थयो छे’असा नारा दिला आहे. ‘सामना’या वृत्तपत्राच्या अग्रलेखातून सेनेने सरकारवर हल्लाबोल केला आहे. सिन्हा हे अक्कलशून्य असतील तर त्यांनी केलेले आरोप खोटे आहेत हे सिद्ध करून दाखवा. असे आव्हानही त्यांनी दिले.

 

Related posts: