|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » साखर सहसंचालक कार्यालयात आंदोलन अंकुशचा ठिय्या

साखर सहसंचालक कार्यालयात आंदोलन अंकुशचा ठिय्या 

प्रतिनिधी /कोल्हापूर :

बगॅसचे संपूर्ण मूल्य धरुन ऊस उत्पादकांना दर द्यावा अशी मागणी आंदोलन अंकुशने केली आहे. या मागणीसाठी गुरुवारी साखर सहसंचालक कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

 राज्यातील सर्व 166 साखर कारखान्यांनी आपले हिशोब शासनाकडे सादर केले आहेत हे हिशोब तपासून ऊस नियंत्रण मंडळ या वर्षीचा उसाचा अंतिम दर कारखाना निहाय ठरवणार आह.s सन 2015 च्या हंगामात साखरेचा बाजार भाव 2400 असताना राज्यातील साखर कारखान्यांनी एफआरपी इतका दर उस उत्पादकांना दिला होता. 2016 मध्ये साखरेचा सरासरी बाजार भाव 3500 रुपये कारखान्यांना मिळाला  आहे. अपवादात्मक कारखाने वगळता एफआरपी अधिक 175 एवढाच दर दिला आहे .2015-16 च्या तुलनेत कारखान्यांना फक्त साखर विकून 110द रुपये जास्त उत्पन्न मिळाले आहे या संपूर्ण वर्षात उपपदार्थाचे दरही दरवर्षीपेक्षा जास्त मिळा ले आहेत फक्त साखर विकून मागील वर्षाच्या तुलनेत कारखान्यांना 1100 रुपये जादा नफा मिळाला आहे. त्यातील 600 रुपये ऊस उत्पादकांना द्यावेत व तसा ठराव आजच्या ऊस नियंत्रण मंडळाच्या बैठकीत करण्यात यावा म्हणून आंदोलन अंकुशच्या वतीने साखर सहसंचालक कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले अंकुशच्या कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन कार्यालयात ठिय्या मारला. रंगराजन समितीच्या 70:30 फॉर्म्युल्याप्रमाणे एफआरपी पेक्षा जादा दर देण्याचा निर्णय शासनाने घेतला .आहे पण यामध्ये उत्पन्न काढत असताना बगॅसचे मूल्य 4 टक्के धरुन त्यातील 70 टक्के शेतकरी व 30 टक्के . कारखानदार अशी वाटणी होणार आहे.