|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » हत्तीकडून कोलीक, पडसाळीत शेतीचे नुकसान

हत्तीकडून कोलीक, पडसाळीत शेतीचे नुकसान 

बाजार भोगाव / वार्ताहर :

      पन्हाळा तालुक्यातील कोलीक – पडसाळी  परिसरात ठाण मांडलेल्या हत्तीने बुधवारी पडसाळी येथील गवताची गंजी उद्ध्वस्त करून झाड उखडून टाकले. तीन शेतकऱयांचे ऊस, नाचना पिकासह शेतीसाठीच्या पी.व्ही.सी. पाईपलाईनचेही नुकसान केले. परिसरातील नागरिकांना सतर्क करण्यासाठी वनविभागाच्या वतीने गस्त घालण्याचे काम सुरू आहे.

    हत्तीने कोलीक येथील दगडू आनंदा कांबळे व रामा आनंदा कांबळे यांच्या ऊस व नाचना पिकाचे नुकसान केले. तर पडसाळी येथील बाळू रामा चांभार यांच्याही पिकांचे नुकसान केले. शिवाय त्यांची गवताची गंजी उद्ध्वस्त करून तेथील हेळ्याचे झाड उखडून टाकले. शेताच्या राखणीसाठी गंजी शेजारी बांधलेल्या पत्र्याच्या डब्याचा आवाज आल्यानेच बिथरलेल्या हत्तीने झाड उखडून टाकले असावे, असा अंदाज वनाधिकाऱयांनी व्यक्त केला आहे. कोलीक, पडसाळी, गोठणे, चाफेवाडी, पिसात्री, मानवाड, वाशी येथील नागरिकांच्या जागृतीसाठी परिक्षेत्र वनाधिकारी प्रशांत तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली मानवाडचे वनपाल मानवाड आर. बी. जाधव, वनरक्षक आशिष चाळसकर, मनीषा देसाई, सुनील कांबळे, के. बी. बादरे, ये. जी. मोरे, वनमजूर नाथा कांबळे, शामराव जाधव, शंकर पवार, आकाराम पाटील, हिंदुराव पाटील, आकाराम खोत परिश्रम घेत आहेत..

Related posts: