|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मुसळधार पावसाने केले हाल

मुसळधार पावसाने केले हाल 

कणकवलीत शिक्षण विभागात पाणी : ‘ढगफुटी’प्रमाणे कोसळला

प्रतिनिधी / कणकवली :

गुरुवारी सायंकाळी 3.30 वाजण्याच्या सुमारास शहरासहीत तालुक्याच्या बहुतांशी भागात ढगफुटीप्रमाणे दोन तास मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे काही सखल भागातसही गावांतील अंतर्गत छोटय़ा मोऱयांवर पाणी आले होते. पंचायत समितीच्या पाठीमागील शाळा नं. 4 च्या इमारतीतही पाणी आले. त्यामुळे सध्या तेथे कार्यरत असलेल्या शिक्षण, पशुसंवर्धन, कृषी विभागाच्या कर्मचाऱयांची तारांबळ उडाली.

दुपारनंतर अचानक गडगडाटसह सुरू झालेला हा पाऊस सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता. या पावसाने नुकसान झाल्याबाबतची माहिती महसूल विभागाकडे प्राप्त नव्हती. मात्र, कोळोशी, आयनल भागात काही ठिकाणी नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. तसेच भातशेतीचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.

                             सावंतवाडीत मुसळधार पाऊस

सावंतवाडी : तालुक्यात गुरुवारी सायंकाळी मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. या पावसामुळे दाणेदार झालेले भाते कोलमडून गेले आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. येत्या 8 दिवसात भात शेती कापण्याजोगी झाली होती. अचानक आलेल्या पावसाने सायंकाळी चार वाजल्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सकाळा दाट धुके, दुपारी कडाक्याचे ऊन आणि संध्याकाळी मुसळधार पाऊस कोसळला. यात कोणतीही हानी झाली नाही. ग्रा. पं. निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान बांदा परिसरातही मुसळधार पावसामुळे वीज व दूरध्वनीसेवा ठप्प झली होते. रात्री सेवा सुरळीत झाली. तुफान कोसळलेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी दिसत हेते. 

Related posts: