|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आंतरराष्ट्रीय कर्णबधिर दिनानिमित्त राज्यात जागृती फेरी

आंतरराष्ट्रीय कर्णबधिर दिनानिमित्त राज्यात जागृती फेरी 

प्रतिनिधी/ पणजी

लहान मुलांचे विकार लवकर लक्षात येत नाही. काही मुले जन्मजात बेहरी असतात आणि बेहरी असल्यामुळे त्यांना बोलता पण येत नसते. वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत विकार कळत नाही. त्यामुळे उपचार घेणे कठीण होते. आणि सरकारच्या सर्व योजना या वयाच्या 6व्या वर्षानंतर सुरु होतात. त्यामुळे पालक या योजनांचा पूरेपूर फायदा घेऊ शकत नाही. असे अनघा वाचासुंदर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आनंद वाचासुंदर यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय कर्णबधिर दिनानिमित्त राज्यात आयोजित जागृती फेरी दरम्यान ते बोलत होते. यावेळी राज्यातील तसेच बाहेरील राज्यातील विशेष शिक्षीकांनी सहभाग घेतला होता.

नविन जन्म झालेल्या मुलांची लक्षणे पालकांनी त्वरीत ओळखायला पाहीजे. तरच आपण आवश्यक असे उपचार करु शकतो, असे विशेष शिक्षिका गोकूळ निवंगुणे हिने सांगितले.

 पणजी मुख्य मार्केट ते आझाद मैदान अशी ही जागृती फेरी लोकांतर्फे काढण्यात आली. तसेच कर्णबधिर या विषयावर लोकांमध्ये जागृती करण्यात आली.