|Wednesday, December 19, 2018
You are here: Home » Top News » नारायण राणे सत्तेत सहभागी होतील : रामदास आठवले

नारायण राणे सत्तेत सहभागी होतील : रामदास आठवले 

पुणे / प्रतिनिधी :

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे प्रबळ तर नारायण राणे हे डॅशिंग नेते आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच राणेंना नवीन पक्ष काढण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार राणेंनी आज (रविवार) नवीन पक्षाची घोषणा केली आहे. हा पक्ष राज्यातील भाजपा सरकार मधील घटक पक्ष राहणार असून, भाजपा राणेंनाही सत्तेत सहभागी करून घेणार असल्याचे आठवले यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, दलित युवकांना सैन्यदलात आणि त्याचाशी संलग्न विभागांमध्ये नोकरीसाठी वेशेष आरक्षण असावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही आठवले यांनी सांगितले.

आठवले म्हणाले, केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियानात सर्वसामान्य नागरिकांनी सहभाग घ्यावा, जसे आपले घर स्वच्छ ठेवतो, त्याप्रमाणे परिसरही स्वच्छ ठेवावा. रस्त्यावर कचरा पडल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. सैन्य भरतीत मागावर्गीय युवकांना आरक्षण मिळावे आणि देशातील सफाई कामगरांना जास्तील जास्त पगार मिळावा यासाठी प्रयत्न करणार आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्याशी चर्चा करणार आहे. नरेंद्र मोदी देशाचे अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. सध्या ते अर्थकारणाची स्वच्छता करीत असून, केंद्रातील भाजपा सरकार महागाई कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे.

Related posts: