|Monday, November 12, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » म्यानमार, बांग्लादेश सीमेवर दोन नवी प्रवेशचौक्या

म्यानमार, बांग्लादेश सीमेवर दोन नवी प्रवेशचौक्या 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताने म्यानमार आणि बांग्लादेश सीमेवरती दोन नवे प्रवेशचौक्या सुरू केल्या आहेत. मिझोरममधील लॉन्गत्लाई जिल्हय़ातील जोरिनपुई येथील तपासणी नाक्याला आवागमन चौकीचा दर्जा मिळाला आहे. वैध प्रवासी कागदपत्रांच्या आधारे उभयदेशांचे नागरिक या चौकीतून भारत तसेच म्यानमारध्ये येऊ-जाऊ शकतात  असे केंद्रीय गृह मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकात सांगण्यात आले आहे. या नवीन चौक्या एकप्रकारे पूर्वोत्तर देशांशी भारताचे असलेले दृढ संबंध अधोरेखित करतात.

यासोबतच केंद्र सरकारने मिझोरममधील लुंगलेई जिल्हय़ातील कावरपुइचुह तपासणी नाक्याला अधिकृत आवागमन चौकी म्हणून घोषित केल्याचेही मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. या चौकीतून बांग्लादेशातून भारतात किंवा भारतातून बांग्लादेशात जाता येणार आहे. म्यानमारच्या सितवे बंदरापासून 287 किमी दूर असणाऱया म्यानमार सीमेवर असणारे जोरिनपुई चौकीला सीमा शुल्क चौकी म्हणून घोषित करण्यात आले आहे. 2012 साली म्यानमार दौऱयावर गेलेल्या तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी जोरिनपुई चौकीचा उल्लेख केला होता. गतवर्षीच्या 5 सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदींच्या म्यानमार दौऱयानंतर या प्रयत्नांना गती मिळाले.

Related posts: