|Wednesday, November 14, 2018
You are here: Home » Top News » ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे यांचे निधन

ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे यांचे निधन 

ऑनलाईन टीम / पुणे :

ज्येष्ठ साहित्यिक ह .मो. मराठे यांचे दीर्घ आजाराने पुण्यात निधन झाले.ते 77वर्षांचे होते. पुण्यातील दीनानाथ रूग्णालयात रविवारी रात्री 1.46 वाजता त्यांनी अखेरचा  श्वास घेतला. गेले अनेक दिवस ते आजारी होते.

1940 साली ह मो मराठेंचा जन्म झाला. त्यांनी अनेक कथा आणि कादंबऱयांचे लिखाण केले.लेखक म्हणून प्रसिद्ध असलेल्या हमोंनी पत्रकारीतेमध्येही आपला ठसा उमटवला होता. त्यांनी किर्लोस्कर मासिकाच्या संपादक मंडळात काम केले. तसेच लोकप्रभा,पुढारी,घरदार,मार्मिक,नवशक्ती आदी नियकालिकांसाठी लिखाण केले. आज सकाळी 9वाजता त्यांच्यावर पुण्रयातील वैकुंठ स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

Related posts: