|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » महात्मा गांधीजींची 148वी जयंती , दिग्गज नेत्यांनी वाहली आदरांजली

महात्मा गांधीजींची 148वी जयंती , दिग्गज नेत्यांनी वाहली आदरांजली 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 148 वी जयंती आहे. जयंतीनिमित्त दिल्लीच्या राजघाटावर आज सर्वपक्षीय नेते हजेरी लावत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह दिग्गज नेत्यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली आहे.

पंतप्रधान मोदींसह माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अनेक नेत्यांनी महात्मा गांधींना आदरांजली वाहिली आणि काही वेळ ध्यानस्थ बसून त्यांच्या स्मृतींना वंदन केले. ‘गांधी जयंतीनिमित्त बापूंना वंदन. त्यांच्या महान आदर्शांनी जगाला प्रेरित केले आहे, अशा शब्दात मोदींनी आदरांजली वाहिली आहे. माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्राr यांचीही आज 113वी जयंती आहे. देशभरात गांधीजींची आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी केली जात आहे.