|Thursday, June 20, 2019
You are here: Home » Top News » आम्हाला बुलेट्र नको, चांगली रेल्वे द्या ; विद्यार्थिनीची मोदींकडे मागणी

आम्हाला बुलेट्र नको, चांगली रेल्वे द्या ; विद्यार्थिनीची मोदींकडे मागणी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबईतील एका विद्यार्थिनीने ऑनलाईन याचिकेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ‘आम्हाला बुलेट ट्रेन नको ,त्यापेक्षा चांगली रेल्वे द्या’, अशी मागणी केली आहे. श्रेया चव्हाण असे या मुलीचे नाव असून ती बारावीत शिकत आहे.

शुक्रवारी संध्याकाळी  change.org सुरू करण्यात आलेल्या याचिकेवर अद्याप दहा हजार लोकांनी स्वाक्षरी केली आहे. 20सप्टेंबर रोजी आपल्या मैत्रणीचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्यामुळे श्रेया संतप्त आहे. ‘ आपल्या मैत्रिणीच्या मृत्यूनंतर आम्ही हा मुद्दा उचलण्याचा निर्णय घेतला आहे. जर विद्यार्थी लोकलने जाऊ शकत नसतील, तर मग बुलेट ट्रेन काय अर्थ आहे?’ असे श्रेया चव्हाणने म्हटले आहे. वर सुरू करण्यात आलेल्या याचिकेमध्ये केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. याचिकेत लिहिण्यात आले आहे की, ‘आकडेवारीनुसार बोलायचे झाले तर, मुंबईतील ट्रकवर दिवसाला नऊ लोक आपला जीव गमवातात, अशा परिस्थितीत पैसा मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनवर खर्च करण्यापेक्षा लोकल ट्रेनची स्थिती सुधारण्यावर खर्च झाला पाहिजे.