|Monday, January 21, 2019
You are here: Home » उद्योग » फेसबुक खाते सुरक्षेसाठी फेसियल रेकग्निशन

फेसबुक खाते सुरक्षेसाठी फेसियल रेकग्निशन 

वृत्तसंस्था/ सॅन फ्रान्सिस्को

फेसबुकच्या वापरकर्त्यांना आपली माहिती, खाते सुरक्षित ठेवण्यासाठी आणि ओळख पटविण्यासाठी कंपनीकडून फेसियल रेकग्निशन ही नवीन सेवेची चाचणी घेण्यात येत आहवे. वापरकर्त्यांना आपली ओळख तत्काळ पटविण्यासाठी आणि रिकव्हरी प्रक्रियेदरम्यान खाते स्वतःचेच असल्याचा पुरावा देत सिद्ध करण्यासाठी ही नवीन सेवा मदत करेल. ही पर्यायी सेवा वापरकर्त्यांनी अगोदरच लॉग इन केलेल्या उपकरणावर उपलब्ध होईल. या नवीन सेवेमुळे ग्राहकांना आपल्या खात्याची ओळख पटविण्यास मदत होईल असे कंपनीकडून सांगण्यात आले.

अनेकदा बंद झालेली खाती पुन्हा सुरू करण्यासाठी कंपनीकडून अनेक पर्यायांचा वापर करण्यात आला आहे. फेसबुक याव्यतिरिक्त व्हिडिओ चॅट उपकरण आणणार असून त्यामध्ये वापरकर्त्यांचा चेहरा ओळखण्याची क्षमता असेल. प्राजेक्ट अलोहा या उपनावाने तयार करण्यात येत असणारे हे उपकरण फेसबुककडून मे 2018 मध्ये सादर करण्यात येईल असा अंदाज आहे. मात्र या उपकरणांच्या वापराबाबत धोका वर्तविण्यात आला आहे. या उपकरणामुळे वापरकर्त्यांचा रेटिना, चेहरा स्कॅन करण्यात आल्याने पाळत ठेवण्यासाठी वापर होण्याची भीती आहे.

Related posts: