|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » आता दररोज एस्टी सह बसस्थानक राहणार चकाचक

आता दररोज एस्टी सह बसस्थानक राहणार चकाचक 

महामंडळाचा स्वच्छतेचा नवीन संकल्प, एका कंपनीकडे जबाबदारी

रत्नागिरी बसस्थानकात संबंधित कंपनीकडून दररोज साफसफाई

 

प्रतिनिधी /रत्नागिरी

एस्टीच्या सर्व बसेस बरोबरच बसस्थानक स्वच्छ राहावे, परिसरात कोणतीही दुर्गंधी पसरू नये, प्रवाशांना स्वच्छ जागेत वावरता यावे यासाठी एस्टी महामंडळाने 2 ऑक्टोंबरपासून स्वच्छतेचा संकल्प सोडला आहे. यासंबंधीची जबाबदारी स्वतंत्र कंपनीकडे सोपविण्यात आली आहे. याचा शुभारंब येथील बसस्थानकात नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्याहस्ते सोमवारी करण्यात आला.

दिवसेंदिवस एस्टी महामंडळाकडून विविध उपक्रम आणि सेवा सुविधा देण्याचा वेगळा प्रयत्न विशेषत़ः परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडून सुरू आहे. बसस्थानकाच्या स्वच्छतागृहांसह संपूर्ण परिसर स्वच्छ राहिला पाहिजे यासाठी अत्याधुनिक मशिनरी, साहित्य संबंधित कंपनीने आपल्या कर्मचाऱयांना पुरवले आहे. जवळपास 15 ते 20 सफाई कामगार आहेत. त्यामुळे आजपासूनच रत्नागिरी बसस्थानकाचा चेहरा मोहरा बदलेला दिसेल असा विश्वास यावेळी नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी व्यक्त केला.

यावेळी एस्टी विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनीदेखील एस्टी स्वच्छतेच्या संकल्पनेबाबत मार्गदर्शन केले. एस.टी. नेहमीच प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सेवा-सुविधा देण्याचा प्रयत्न करत असते. आता दिवाळीच्या निमित्ताने या स्वच्छ बसस्थानकात दिवाळी फराळ व साहित्य विक्री स्टॉलही 8 ऑक्टोंबरपासून लागणार आहे. अतिशय चांगल्या प्रकारे स्वच्छता प्रत्यक्षात प्रवाशांना यापुढे पहावयास मिळेल असेही त्यांनी सांगितले.

यावेळी संबंधित कंपनीचे सर्व कामगार कार्यक्रमाला उपस्थित होते. तसेच नगरसेविका स्मितल पावसकर, अस्मिता चवंडे, आगारव्यवस्थापक एस.बी.सय्यद आदी पदाधिकारी उपस्थित होते.

रत्नागिरी बसस्थानकातील स्वच्छतागृहाच्या अस्वच्छतेबाबत यापूर्वी वारंवार तक्रारी येत होत्या यापुढे या तक्रारी येणार नाही अशा पध्दतीने स्वच्छतेचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी स्वतः महामंडळाने स्वच्छतेच्या कंपनीकडे हे काम सोपवले असल्याची माहिती विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली.

Related posts: