|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » सोशल मिडीयावर ‘अफवांचे मासे’!

सोशल मिडीयावर ‘अफवांचे मासे’! 

केळशी परिसरात मोठय़ा प्रमाणात ‘स्टींग रे’ सापडल्याची चर्चा

व्हॉटसऍपवरील व्हायरल फोटोंमुळे संभ्रम

प्रतिनिधी /दापोली

दापोली तालुक्यातील केळशी, मुरूड आदी किनाऱयांवर सोमवारी स्टींग रे (वागळी) जातीचे मासे मोठय़ा प्रमाणावर मृतावस्थेत आढळल्याची चर्चा सुरू होती. मात्र प्रत्यक्षात असे काहीही घडले नसून या केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोणतीही खातरजमा न कराता व्हॉटसअपवर आलेले फोटो व्हायरल झाल्याने हा सगळा प्रकार घडल्याचे पुढे येत आहे.

‘स्टींग रे’ जातीचे हे मासे मोठय़ा प्रमाणावर दापोली तालुक्यातील केळशी, मुरूड, हर्णे आदी किनाऱयावर सापडल्याचे वृत्त सोमवारी दिवसभर सोशल मिडीयावर पसरल होते. या माशांच्या शेपटीला विषारी काटे असल्याने ते घातक समजले जातात. हे मासे किनाऱयावर सापडल्याच्या वृत्ताने नेटीझन्समध्ये हलचल निर्माण झाली होती. मात्र प्रत्यक्ष खातरजमा केली असता केळशी परिसरात याबाबतची कोणतीही कल्पना व चर्चाही नसल्याचे जाणवले. मच्छीमारांशी संपर्क साधला असता त्यांच्यासाठीसुद्धा ही नवीनच बातमी होती.

मच्छी लिलावाचे मुख्य केंद्र असलेल्या हर्णैमध्येही याबाबतची कोणतीही माहिती नव्हती. स्थानिक भाषेत वागळी म्हणून ओळखल्या जाणारा हा मासा सापडला असता तर तो लिलावासाठी याच बंदरात आला असता. हा मासा मोठय़ा प्रमाणावर निर्यात केला जात असल्याने मच्छीमारांना ही पर्वणीच ठरली असती, पण तसे काही घडले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सोशल मिडीयाचा अतिवापर व खातरजमा न करता करण्यात येणारे फॉरवर्ड्स यामुळे निर्माण होणाऱया गोंधळाच्या या निमित्ताने पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे.

Related posts: