|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » क्रिडा » मुगुरूझाची स्पर्धेतून माघार

मुगुरूझाची स्पर्धेतून माघार 

वृत्तसंस्था/ बिजिंग

येथे सोमवारपासून सुरू झालेल्या चीन खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेतून स्पेनची टॉप सीडेड महिला टेनिसपटू गार्बेनी मुगुरूझाने प्रकृती नादुरूस्तीमुळे माघार घेतली आहे.

या स्पर्धेतील पहिल्या फेरीच्या सामन्यात मुगुरूझाची लढत झेकच्या स्ट्रायकोव्हा बरोबर होती. या सामन्यात स्ट्रायकोव्हाने पहिला सेट 6-1 असा जिंकला होता. दुसऱया सेटमध्ये 0-2 असे पिछाडीवर असताना 23 वर्षीय मुगुरूझाच्या प्रकृतीमध्ये अचानक बिघाड झाला. तिला अधिक अशक्तपण जाणवू लागला. मुगुरूझाने यानंतर या स्पर्धेतून माघार घेतल्याचे जाहीर केले. अन्य एका सामन्यात अमेरिकेच्या स्टीफेन्सला तिच्याच देशाच्या व्हिमपरकडून 3-6, 0-6 अशा सरळ सेटस्मध्ये तासभराच्या कालावधीत पराभव पत्करावा लागला.