|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » अखेर जिल्हा बँकेसमोरील गटराचे पालिकेने केली दुरुस्ती

अखेर जिल्हा बँकेसमोरील गटराचे पालिकेने केली दुरुस्ती 

प्रतिनिधी/ सातारा

सातारा शहरातील व्हिआयपी रस्ता म्हणून शिवतीर्थ ते बॉम्बे रेस्टॉरंट या रस्त्याला ओळखले जाते. याच रस्त्याला जिल्हा परिषदेच्या चौकात गेल्या कित्येक महिन्यापासून गटर तुंबले आहे. ते रस्त्यावरुनच वाहत आहे. त्याबाबत नागरिकांनीही वारंवार सोशल मीडिया व मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवला. परंतु प्रशासनाकडून कार्यवाही होत नव्हती. सोमवारी सुट्टीच्या दिवशीही पालिकेच्या आरोग्य विभागाने गटर दुरुस्ती गेली. विशेषत मुख्याधिकारी शंकर गोरे आणि आरोग्य सभापती वसंत लेवे यांनी दुरुस्ती कर्मचाऱयांकडून उभे राहून करवून घेतली.

सातारा शहरात अधिकारी, नेते मंडळींचा जाण्यायेण्याचा रस्ता म्हणजे जिल्हा परिषदेच्या समोरील चौक हेच समिकरण असते. कारण शासकीय विश्रामगृह, ज्ल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयांना जोडणारा हा चौक. या चौकात गेल्या काही महिन्यापासून गटर चोकअप होवून गटरंगगा रस्त्यावर वाहत आहे. त्याबाबत सामाजिक कार्यकर्ते चिन्मय कुलकर्णी यांनीही या रस्त्याच्या गटर तुंबलेल्याच्या तक्रारी बांधकाम विभागाकडे दिल्या होत्या. बांधकाम विभागाकडून कार्यवाही होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात होती. सोमवारी मात्र पालिका प्रशासनाने दुरुस्तीचे काम हाती घेतले. सकाळीच पालिकेचे आरोग्य सभापती वसंत लेवे, मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी आरोग्य विभागाचे आरोग्य निरीक्षक शिवदास साखरे यांना सुचन देत कामाला सुरुवात केली. जेसीबी व कर्मचाऱयांच्या सहाय्याने  दुरुस्तीचे काम सुरु केले होते. दुपारपर्यंत दुरुस्त करण्यात आले. पालिकेने केलेल्या कामाबद्दल कौतुक होवू लागले आहे.