|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आल्त दाबोळीतील महामार्गावर बस उलटली

आल्त दाबोळीतील महामार्गावर बस उलटली 

प्रतिनिधी/ वास्को

आल्त दाबोळी येथील चौपदरी महामार्गावर खासगी प्रवासी बस उलटण्याची घटना घडली. या बसमध्ये चालका व्यतिरीक्त कोणी नव्हता. त्यामुळे कुणी जखमी होण्याचा प्रसंग उद्भाभवला नाही. चालकाने मात्र, घटनास्थळावरून पळ काढला.

सोमवारी संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास आल्त दाबोळीतील नौदल डेपोजवळील महामार्गावर ही बस उलटली. उपलब्ध माहितीनुसार सदर बसच्या मालकाचे घर या रस्त्याच्या शेजारीच असून बस त्या ठिकाणी पार्क करण्यासाठी चालक घेऊन जात होता. मात्र, बस अचानक रस्त्यावर कोसळण्याचे कारण स्पष्ट झालेले नाही. चालकाने भितीनेच घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेमुळे या महामार्गावरील वाहतुकीत व्यत्यय आला. सुमारे तासभर वाहतुक अडकून पडली. पोलिसांनी क्रेनव्दारे बस उचलून रस्ता वाहतुकीस मोकळा केला.