|Friday, November 16, 2018
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » Reliance Jio Unlimited Calling होणार बंद !

Reliance Jio Unlimited Calling होणार बंद ! 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

देशभरात अनलिमिटेड कॉलिंग देणारी 4 जी नेटवर्क कंपनी रिलायन्स जिओने आत्तापर्यंत आपल्या असंख्य ग्राहकांना फ्री कॉलिंगची सुविधा पुरवली. मात्र, या सुविधेचा अनेकजण अनावश्यक वापर करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा लिमिटेड करण्याचा विचार कंपनीकडून केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

रिलायन्स ग्रुपचे मुकेश अंबानी यांनी जिओची सुविधा लाँचिंग करताना जिओची वॉइस कॉलिंग सुविधा कायमस्वरुपी मोफत राहील, अशी घोषणा केली होती. तसेच जिओची ही सुविधा लाँच केल्यानंतर असंख्य युजर्स याचा वापर व्यवसायासाठी वापर करत असल्याचे कंपनीच्या निर्देशनास आले. तसेच सध्या अन्य काही मोबाईल कंपन्यांकडून कॉलिंगसाठी 300 मिनिटे प्रतिदिवस दिले जात आहेत. त्यामुळे जिओकडून अनलिमिटेड कॉलिंगवर निर्बंध आणण्याचा विचार सुरु आहे.

युजर्सना अनलिमिटेड कॉलिंगऐवजी 300 मिनिटे प्रतिदिवस देण्याबाबत विचार सुरु आहे. मात्र, हा नवा प्लॅन जिओच्या सर्वच ग्राहकांसाठी नसून, काही ग्राहकांसाठी असल्याचे कंपनीकडून सांगिण्यात आले.

Related posts: