|Saturday, August 24, 2019
You are here: Home » क्रिडा » श्रीलंका संघाचा भारत दौरा निश्चित

श्रीलंका संघाचा भारत दौरा निश्चित 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पुढील महिन्यात श्रीलंकन संघ भारत दौऱयावर येत असून, या दौऱयात ते 3 कसोटी, 3 वनडे व 3 टी-20 सामने खेळणार आहेत. 16 नोव्हेंबरला कोलकाता येथील सामन्याने या दौऱयाला प्रारंभ होईल. भारत मायदेशात सलग मालिका खेळणार असून ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेनंतर त्यांच्यासोबत 3 टी-20 सामने होणार आहेत. ही मालिका संपली की भारत न्यूझीलंडबरोबर दोन हात करणार असून त्या मालिकेनंतर श्रीलंकेविरुद्ध मालिकेला सुरुवात होईल. यात कोलकाता, नागपूर व दिल्ली येथे तीन कसोटी सामने होतील. त्यानंतर धरमशाला, मोहाली, विशाखापट्टणम येथे तीन वनडे सामने होणार असल्याचे बीसीसीआयने सांगितले. 24 डिसेंबर रोजी मुंबईतील तिसऱया टी-20 सामन्याने दौऱयाची सांगता होणार आहे.