रेल्वेओव्हरब्रिजसंदर्भात आज बैठक

प्रतिनिधी / बेळगाव
ब्रिटिशकालीन रेल्वेओव्हरब्रिज हटवून नव्याने पुलाची उभारणी करण्याची तयारी प्रशासनाने चालविली आहे. पर्यायी मार्ग उपलब्ध करूनच काम सुरू करण्यात यावे, या मागणीकरिता विविध संघटनांनी जिल्हाधिकाऱयांना निवेदने दिली होती. मात्र याकडे दुर्लक्ष करून काम सुरू करण्याचा घाट सुरू आहे. रहदारी नियोजन करण्यापूर्वी कामाचा शुभारंभ करण्यात आल्याने पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बुधवार दि. 4 रोजी दुपारी 5.30 वाजता बापट गल्ली येथील गिरीश कॉम्प्लेक्समधील भगतसिंग सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली आहे.
यावेळी नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ऍड. अशोक पोतदार, माजी महापौर ऍड. नागेश सातेरी, माजी नगरसेवक नेताजी जाधव, भ्रष्टाचार निर्मूलनचे सुजिद मुळगुंद, माजी महापौर मालोजी अष्टेकर, रमेश सेंटकी, श्रीनिवास ताळुकर आदींनी केले आहे.
Related posts:
Posted in: बेळगांव