|Friday, August 17, 2018
You are here: Home » Top News » फवारणीतून विषबाधा झाल्याने तीन महिन्यात 18 शेतकऱयांचा मृत्यू

फवारणीतून विषबाधा झाल्याने तीन महिन्यात 18 शेतकऱयांचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / मुंबई :

यवतमाळ जिह्यात किटकनाशकांच्या फवारणीतून विषबाधा झाल्यामुळे तीन महिन्यात 18 शेतकऱयांचा मृत्यू झाल्याने आता सरकार खडबडून जागे झाले आहे. याप्रकरणाची अतिरिक्त मुख्य गृह सचिवांकडून चौकशी करणयाचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आला आहे.

पीडित कुटुंबीयांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत दोन लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. अशा दुर्घटना टाळण्यासाठी ‘सेफ्टी किट’वितरीत करण्याचे बंधन कीटकनाशक कंपन्यांवर घालण्यात येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या घटनेवर चिंता व्यक्त केली. विमा योजनेसाठी अपात्र किंवा तांत्रिक कारणाने विमा कंपन्यांकडून मदत मिळू न शकणाऱया शेतकऱयांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री निधीतून मदत करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले आहे. फवारणीबाबत कृषी विभागातर्फे जनजागरण मोहिम हाती घेण्यात येईल.

 

Related posts: