|Monday, January 21, 2019
You are here: Home » Top News » पेट्रोल डिझेल दोन रूपयांनी स्वस्त

पेट्रोल डिझेल दोन रूपयांनी स्वस्त 

ऑनलाईन टीम / मुंबई :

गेल्या काही दिवसांपासून वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना आता काहीसा दिलासा मिळणार आहे. कारण सरकारने पेट्रोल, डिझेलवरील एक्साईज डय़ूटी घटवल्याने दर सुमारं दोन रूपयांनी स्वस्त होती. आजपासून हा बदल लागू केला जाणार आहे.

पेट्रोल डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत होती. 1 जुलै ते 20 सप्टेंबर दरम्यान पेट्रोलच्या दरात सुमारे 7.43 रूपयांची वाढ झाली. प्रत्येक शहारांनुसार ही वाढ कमी जास्त होती. अमेरिकेतील दाने भयंकर वादळांमुळे तेलाचे भाव वाढल्याचे कारण केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले होते. मात्र आधीच दरवाढीमुळे त्रस्त असलेल्या जनतेला अमेरिकेतील वादळाचे कारण पुढे केल्याने त्यांना आणखी तीव्र टीकेला समारे जावे लागेल. जागतिक स्तरावर रिफानरींच्या क्षमतेत 13 टक्क्यांची घट झाली आहे. गेल्या तीन महिन्यात पेट्रोलच्या आंतरराष्ट्रीय दरात 18 टक्क्यांची, तर डिझेलच्या आंतरराष्ट्रीय दरात 20 टक्क्यांची वाढ झाली. त्यामुळे भारतातही पेट्रोल, डिझेलचे भाव वाढलेले पहायला मिळाले.

 

Related posts: