|Thursday, July 18, 2019
You are here: Home » क्रिडा » राष्ट्रकुल स्पर्धेसाठी तीन भारतीय पंचांची निवड

राष्ट्रकुल स्पर्धेसाठी तीन भारतीय पंचांची निवड 

वृत्तसंस्था/ झ्युरिच

आंतराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने (एफआयएच) पुढील वषी ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे होणाऱया राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी तीन भारतीय पदाधिकाऱयांची निवड केली आहे.

दविंदर भाटिया यांची जज म्हणून नियुक्ती केली आहे तर दीपक जोशी व दुर्गा देवी हे पंचगिरी करणार आहेत. 56 वषीय दविंदर भाटिया यांची अलीकडेच एफआयएच तांत्रिक पदाधिकारी विभाग 3 बहिस्थ हॉकीमध्ये बढती झाली असून आपल्या परिश्रमाचे सार्थक झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. ‘भारतीय महिला हॉकी संघाची मी माजी खेळाडू असून 1981 मधील आशिया कप व 1982 मधील आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या संघाची सदस्या आहे. माझ्या नियुक्तीने जो आनंद झालाय तो मी शब्दांत सांगू शकत नाही,’ असे त्या म्हणाल्या. हॉकी इंडियाचे प्रयत्न व माझे परिश्रम अखेर फलद्रूप ठरल्याचा आणि या वयातही उच्च स्तरावर मी देशाचे प्रतिनिधित्व करू शकतो, याचा अभिमानही मला वाटतो, असेही त्या म्हणाल्या.

या स्पर्धेसाठी पंच म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अन्य दोन भारतीयांनीही अशाच भावना व्यक्त केल्या आहेत. ‘डिप्लोमा कोर्स पूर्ण केल्यानंतर 2011 मध्ये हॉकी प्रशिक्षण देण्याचे काम सुरू केले. 2013 मधील हॉकी वर्ल्ड लीग दुसऱया टप्प्यात मला स्वयंसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर 2013 मधील कनि÷ पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेतील सराव सामन्यात मी पंचांचे काम पाहिले होते. आपण पंचांचे काम करियर म्हणून निवडू शकतो, हे लक्षात आल्यानंतर मी त्याकडे पूर्ण लक्ष केंद्रित केले,’ असे 29 वषीय दीपक जोशी म्हणाले. 33 वषीय दुर्गा देवी म्हणाल्या की, ‘2003 मध्ये मी हॉकीची कारकीर्द सुरू केली आणि हिमाचल प्रदेशचे प्रतिनिधित्व केले. पण राष्ट्रीय संघात माझी निवड होऊ शकली नाही. त्यानंतर म्हणून पंचगिरीवर लक्ष केंद्रित केले. हॉकी इंडियाने मला अनेक संधी दिल्या त्यापैकीच ही एक आहे.’

राष्ट्रकुल स्पर्धा पुढील वषी 4 ते 15 एप्रिल या कालावधीत होणार असून भारताचे दोन्ही संघ त्यात सहभागी होणार आहेत.