|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » डी. आर. माने महाविद्यालयात ‘हरित सेना’ स्थापन

डी. आर. माने महाविद्यालयात ‘हरित सेना’ स्थापन 

प्रतिनिधी/ कागल

येथील डी. आर. माने महाविद्यालयात किर्लोस्कर वसुंधरा महोत्सव 2017-18 तसेच  निसर्गमित्र संस्था यांचेकडून प्रेरणा घेवून संस्थेचे अनिल चौगुले व महाविद्यालयातील प्रा. उषा रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रा. कंचन पटेल यांच्या सहकार्याने ‘हरीत सेना’ (ग्रीन आर्मी) ची स्थापना कण्यात आली. यावेळी हरितसेने मार्फत निसर्ग संवर्धन, वृक्षसंवर्धनासाठी वर्षभर विविध कृतीशील उपक्रम राबविण्याचे निश्चित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. बी. जी. कुलकर्णी होते.

याचाच एक भाग म्हणून विजयादशमी (दसरा) निमित्त आपटा कांचन व शमी वृक्षाचे महत्व व संवर्धन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना यावेळी रोपांचे वाटप करण्यात आले. ही रोपे विद्यार्थ्यांनी आपआपल्या गावात मध्यवर्ती ठिकाणी गावकऱयांच्या उपस्थितीत आपटय़ाची रोपे लावली. वर्षभर अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचे निश्चित पेले. या कार्यक्रमात हरिदास शिंदे यांने आपटय़ाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी प्रा. उषा रसाळ, प्रा. कंचन पटेल यांनी मार्गदर्शन केले.

स्वागत व प्रास्ताविक विद्यार्थी हरी आवटे याने केले. आभार दिपक वाडकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हरी आवळे व नितीन मेथे यांचे विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विभागातील विद्यार्थी-विद्यार्थी सहभागी झाले होते.

Related posts: