|Monday, October 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » बाळ्ळीनजीक अपघातात एक ठार एक गंभीर जखमी

बाळ्ळीनजीक अपघातात एक ठार एक गंभीर जखमी 

प्रतिनिधी/ कुंकळ्ळी

पाटी बाळ्ळी येथे बुधवारी सायंकाळी उशिरा झालेल्या एका अपघातात एक जागीच ठार झाला तर महिला पोलीस गंभीररित्या जखमी झाली.

प्राप्त माहितीनुसार एका दुचाकीवरुन खड्डे बाळ्ळी येथील संदीप शंकर गावकर (33) व विश्रांती नारायण गावकर (24) काणकोणच्या दिशेने जात होती. पाटीबाळ्ळी येथील एका धोकादायक वळणावर समोरुन येणाऱया एका कारची जबरदस्त धडक या दुचाकीला बसली आणि दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजुला फेकली गेली.

कार उलटून चारही चाके वर झाली. या अपघातात संदीप शंकर गावकर जागीच ठार झाला. सुरुवातीला गंभीररित्या जखमी झाला म्हणून दुचाकीवरील दोघांना बाळ्ळी येथील प्राथमीक आरोग्य केंद्रात नेण्यात आले तेव्हा संदीप गावकर याला मृतावस्थेत आणले अशी तेथील डॉक्टरांनी नोंद केली.

दुचाकीच्या मागे बसलेली विश्रांती हिची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तिला मडगावच्या सरकारी इस्पितळात नेण्यात आले. मात्र, तिची प्रकृती आणखीन नाजुक बनल्यामुळे तिला बांबोळीला हलविण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Related posts: