|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » उद्योग » मोफत इंटरनेटबाबत सरकारने पूनर्विचार करावा -ट्राय

मोफत इंटरनेटबाबत सरकारने पूनर्विचार करावा -ट्राय 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) ग्रामीण भागात मोफत इंटरनेट सुविधा पुरविण्यासंबंधी प्रस्तावाचा चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात टोलावला आहे. ग्रामीण भागातील अधिकांश जनता इंटरनेटचा खर्च पेलू शकत नाही. मात्र डिजिटल सशक्तिकरणासाठी इंटरनेट सुविधा पुरविणे आणि त्याचा वापर होणे गरजेचे असल्याचे सांगत केंद्रानेच मोफत डेटा पुरविण्याबाबत निर्णय घ्यावा असे ट्रायने सुचविले आहे.

   ट्रायने गतवर्षीच्या डिसेंबर महिन्यात ग्रामीण भागातील इंटरनेटचा खर्च पेलण्यास असणारी अक्षमता दूर करण्यास मोफत डेटा पुरविण्याची शिफारस केली होती. मात्र दूरसंचार कमीशनने गत महिन्यात ट्रायच्या या शिफारसीत आणखी सुधारणा करण्याची सूचना करत ते परत पाठवले. गुंतवणूकदारांच्या व्यावसायिक हितसंबंधाना बाधा न पोहचवता मोफत डेटा पुरविणे कसे शक्य होईल याबाबत सांगण्याची सूचनाही कमीशनने ट्रायला केली होती. सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इन्डिया (आयएमसी-डेलॉयट) नुसार देशातील फक्त 16 टक्के लोकच इंटरनेट सेवेचा वापर करत असून वापरकर्त्यांची संख्या 33 टक्के क्षेत्रामध्येच एकटवली गेली आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील दरी मिटवायची असेल तर मोफत इंटरनेट पुरविण्याबाबत गांभीर्याने विचार व्हावा असे ट्रायचे म्हणणे आहे.

 

 

Related posts: