|Wednesday, July 18, 2018
You are here: Home » उद्योग » रिलायन्स आणि ऍपल आयफोनसाठी एकत्र

रिलायन्स आणि ऍपल आयफोनसाठी एकत्र 

 कोलकाता / वृत्तसंस्था :

 मोबाईल उत्पादक कंपनी ऍपल आणि मुकेश अंबानीची रिलायन्स इन्डस्ट्रीज या दोन्ही दिग्गज कंपन्या लवकरच भागीदारीत उतरणार आहेत. या भागीदारी अंतर्गत रिलायन्स  प्रतिष्ठित अमेरिकी नाममूद्रा ऍपलला आपल्या किरकोळ विक्री आणि दूरसंचार विभाग रिलायन्स डिजिटल आणि रिलायन्स जियोद्वारे 900 शहर आणि 2,000 हून अधिक विक्री केंद्रापर्यंत पोहोचवणार आहे. बाजारातील जाणकारांनुसार भागीदारी करारान्वये रिलयान्सला आता ऍपल उत्पादनांचे थेट वितरण हक्क प्राप्त होणार आहे. यापूर्वी रिलायन्स डिजिटलच्या दालनांमध्ये अन्य वितरकांकडून ऍपलची उत्पादने पुरविण्यात येत होती. वर्तमानात 150 हून अधिक शहरांमध्ये ऍपलचे दोन हजारच्या जवळपास वितरक आहेत.

ऍपल आयफोन विक्रीसाठी महानगर तसेच छोटय़ा शहरांमध्ये वेगाने विस्तार करू इच्छितो. जेथे रिलायन्सजवळ पहिल्यापासूनच पायाभूत व्यवस्था अस्तित्वात आहे. रिलायन्सशी हातमिळवणी केल्यामुळे ऍपलची किरकोळ विक्री क्षेत्रातील उपस्थिती दुप्पट होत 4,000 दालनांपर्यंत पोहोचणार आहे. तसेच रिलायन्स देखील सर्व तऱहेचे मोबाईल विक्री करू इच्छितो. त्यामुळे ही भागीदारी दोघांसाठी लाभप्रद असल्याचे जाणकारांचे मत आहे. सूत्रांनुसार आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लस सारखेच येऊ घातलेल्या ऍपलच्या ‘आयफोन एक्स’साठी देखील रिलायन्स बंडलिंग प्लान देऊ इच्छिते. या अंतर्गत पुनर्खरेदीची हमी तसेच मोफत डेटा सारख्या आकर्षक योजनांचा समावेश असेल जे रिलायन्सकडून देण्यात येईल. रिलायन्स देशातील सर्वात मोठी आयफोन विक्रेती बनून इच्छिते. सध्या ई-कॉमर्स कंपन्या फ्लिपकार्ट आणि ऍमेझॉन यांच्याकडे हा मान आहे.

 

 

Related posts: