|Monday, October 15, 2018
You are here: Home » उद्योग » सलग दहाव्या वर्षी मुकेश अंबानी फोर्ब्स यादीत शीर्ष स्थानी

सलग दहाव्या वर्षी मुकेश अंबानी फोर्ब्स यादीत शीर्ष स्थानी 

नवी दिल्ली/ वृत्तसंस्था :

फोर्ब्स मासिकाने 2017 मधील 100 सर्वाधिक श्रीमंत भारतीयांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत 38 अब्ज डॉलर्सच्या (2.5 लक्ष कोटी रुपये) संपत्तीसह रिलायन्स इन्डस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी शीर्ष स्थानी आहेत. त्यानी सलग दहाव्या वर्षी हा मान पटकावला आहे.  विप्रोचे अध्यक्ष अजीम पेमजी दुसऱया तर हिंदुजा बंधू तिसऱया स्थानावर विराजमान आहेत. अजीम प्रेमजी यांच्याकडे 19 अब्ज डॉलर्सची तर हिंदुजा बंधूंकडे एकूण 18.4 अब्ज डॉलर्सची संपत्ती असल्याचे फोर्ब्सने म्हटले आहे. विशेष म्हणजे आर्थिक मंदीतही सर्वोच्च 100 धनाडय़ व्यक्तिंच्या संपत्तीत 26 टक्के वृद्धी झाल्याचे फोर्ब्सने म्हटले आहे.

   या यादीत ब्रिटानियाचे नसली वाडिया यांचाही समावेश आहे. 73 वर्षीय 5.6 अब्ज डॉलर्सचे मालक आहेत. या यादीत एव्हेन्यू सूपरमार्ट्सच्या राधकिशन दमानी यांनी पुनरागमन केले आहे. त्यांच्याकडे एकूण 9.3 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. या यादीत प्रवेश मिळवलेले पेटीएमचे 39 वर्षीय मालक विजय शेखर सर्वात तरुण अब्जपती ठरले आहेत. त्यांची एकूण संपत्ती 1.47 अब्ज डॉलर्स इतकी  आहे.

सर्वाधिक श्रीमंत भारतीयांच्या यादीत 7 महिला

ओ पी जिंदल समूहाच्या अध्यक्षा सावित्री जिंदल आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील किरण मजूमदार-शॉ या महिलांनी या यादीत स्थान मिळविले आहे. सावित्री जिंदल आणि परिवार 7.5 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह 16 व्या स्थानी आहेत. त्यांच्यानंतर 3.45 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह ल्यूपिनचा गुप्ता परिवार चाळीसाव्या स्थानी आहे. हॅवेल्स इन्डियाचा गुप्ता परिवार 3.11 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह 48 व्या स्थानी तर बेनेट कोलमन ऍन्ड कंपनीच्या संचालिका इंदू जैन 3 अब्ज संपत्तीसह या यादीत 51 स्थानावर विराजमान आहेत. अन्य महिला धनाढय़ांत यूएसवी इन्डियाच्या लीना तिवारी 2.19 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह 71व्या तर बायोकॉनच्या मजूमदार-शॉ 2.16 अब्ज डॉलर्ससह 72व्या स्थानी आहेत.

 

Related posts: