|Saturday, January 19, 2019
You are here: Home » उद्योग » स्पाईसजेट करणार 100 एम्फीबियन विमानांची खरेदी

स्पाईसजेट करणार 100 एम्फीबियन विमानांची खरेदी 

गुवाहाटी / वृत्तसंस्था :

किफायतशीर दरात हवाईवाहतूक सेवा पुरवणारी कंपनी स्पाईसजेटने तब्बल 100 एम्फीबियन विमाने खरेदी करण्याची योजना आखली आहे. प्रादेशिक हवाईवाहतूक सेवेचा विस्तार करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असून यासाठी 40 कोटी डॉलर्सचा खर्च अपेक्षित असल्याचे स्पाईसजेटचे अध्यक्ष अजय सिंह यांनी सांगितले.

एम्फीबियन विमानांचे वैशिष्ठय़ म्हणजे ही विमाने भूपृष्ठासह पाण्यावरही अलगद उतरू शकतात. या 14 आसन क्षमता असणाऱया विमानांसाठी जपानच्या सेतोची होल्डिंग्स सोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. प्रादेशिक उड्डाणांना गती देत भौगोलिकदृष्टय़ा आव्हानात्मक प्रदेशांना स्पाईसजेटने जोडण्यासंबंधी योजनेची घोषणा करताना, एम्बीफियन विमानांचा दूर-सुदूर भागांत कशाप्रकारे प्रभावी वापर करता येणे शक्य आहे, हे जाणून घेण्यासाठी सेतोची होल्डिंग्ससोबत करार करण्यात आल्याचे सिंह यांनी सांगितले. एका प्रश्नाला उत्तर देताना 100 विमानांचा खरेदी व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर अशा आणखी काही विमानांचा आपल्या ताफ्यात समावेश करण्यात येईल. तसेच ही विमाने महागडी नसल्याचेही स्पाईसजेटकडून सांगण्यात आले आहे. एका एमफीबियन विमानाची किंमत ही 40 लक्ष डॉलर्स इतकी आहे.

 

 

Related posts: