|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » उद्योग » भारतातील कार्यासाठी व्होल्वो कार्सतर्फे चार्ल्स प्रंप यांची नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती

भारतातील कार्यासाठी व्होल्वो कार्सतर्फे चार्ल्स प्रंप यांची नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली :

व्होल्वो कार्सने चार्ल्स प्रंप यांची भारतातील आपल्या कार्यासाठी व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांनी आपली नवी जबाबदारी आणि कार्यभार 3 ऑक्टोबर 2017 पासून स्वीकारला आहे. त्यांचे पूर्वाधिकारी टॉम वॉन ड्रॉफ हे आपल्या कार्यकाळ पूर्ण करून आपल्या मायदेशी स्वीडनला व्होल्वे समूहातच नवीन जबाबदारीसाठी परतले आहेत. व्होल्वे ऑटो इंडियाच्या सेल्स अािण मार्केटिंगच्या संचालिका ज्योती मल्होत्रा या तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्थापकीय संचालिका म्हणून कार्यभार बघत होत्या.

चार्ल्स प्रंप गेली 17 वर्षे वाहन उद्योगात अग्रणी असून ते वॉल्वो कार समुहाबरोबर गेली 8 वर्षे जोडलेले आहेत. त्यांची याआधीची जबाबदारी मार्केटिंग विभागात वरिष्ठ संचालक म्हणून स्वीडनमध्ये होती. चार्ल्स यांनी जपान, चीन, अमेरिका आणि स्वीडन अशा बाजारपेठांमध्ये कार्य केले आहे. भारतातील अलिशान गाडय़ांच्या प्रकारात व्होल्वोच्या शिरकावाला चालना देण्यास त्यांचा उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये कार्य करण्याचा अनुभव महत्वाचा ठरेल.

गेला काही काळ व्होल्वे कार्ससाठी खूप उत्साहाचा राहिला आहे. ज्यामध्ये नवीन उत्पादनांचे अनावरण, जाळ्याचा विस्तार, सेवा उपक्रम आणि ब्रांड गुंतवणूक यामुळे एकूण विक्रीत गेल्या दोन वर्षात 32 टक्के वाढ झाली आहे. जेंव्हा क्षेत्रातील एकूण वृद्धी अपेक्षापेक्षा कमी होती. ब्रांड बाबतचा विश्वास वाढवण्यासाठी सीकेडीची घोषणा हे आणखी एक पाऊल आहे आणि पहिली मेड इन इंडिया कार लवकरच आम्ही सादर करणार आहोत.

या नेमणूकी विषयी बोलताना चार्ल्स प्रंप म्हणाले की, भारतात व्होल्वे कार्स बरोबर कार्य करण्याची खूप चांगली संधी आहे. जगातील सत जास्त क्षमता असलेली लक्झरी कार बाजारपेठ म्हणून भारत व्होल्वेसाठी खूप महत्वाचा आहे. माझी जबाबदारी ही व्होल्वेच्या जोमदार वृद्धीत सातत्य राखणे आणि त्याला चालना देण्याची आहे. भारतात असलेल्या आव्हानांची मला जाणीव आहे आणि इतर उदयोन्मुख बाजारपेठा मधला माझा अनुभव मला उपयोगी पडेल.