|Thursday, December 13, 2018
You are here: Home » उद्योग » चढ-उतारानंतरच्या नफावसुलीमुळे भांडवली बाजारात घसरण

चढ-उतारानंतरच्या नफावसुलीमुळे भांडवली बाजारात घसरण 

मुंबई/ वृत्तसंस्था :

गुरूवारी चढ-उतारांसहीत व्यवसाय करत दोन्ही प्रमुख भांडवली बाजार घसरणीसह बंद झाले. नफावसुलीमुळे बाजारात दबाव दिसून आला. प्रांरभिक सत्रात बाजारात तेजीचे वातावरण होते. मात्र सेन्सेक्स आणि निफ्टीला दिवसभराच्या उच्चांकाजवळ स्थिरावण्यास अपयश आले. सेन्सेक्सने गुरूवारच्या सत्रात 31,772.41 अंकांपर्यंत तर निफ्टीने 9,946 अंकांपर्यंत मजल मारली होती.

सत्राच्या अखेरीस सेन्सेक्स 80 अंक (0.25 टक्के) घसरत 31,592 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी  26 अंकांच्या (0.25 टक्के) पडझडीसह 9,889 अंकांवर स्थिरावला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्ये चांगली खरेदी झाली. बीएसईच्या मिडकॅप निर्देशांक 0.5 टक्क्यांनी मजबूत होत बंद झाला. मिडकॅप 100 निर्देशांकही 0.8 टक्क्यांनी वधारला. बँकिंग, ग्राहकोपयोगी वस्तू, माहिती तंत्रज्ञान, भांडवली वस्तू आणि तेल व नैसर्गिक वायू समभागांमध्ये झालेल्या विक्रीमुळे बाजारात दबाव दिसून आला. बँक निफ्टी 0.25 टक्के घसरत 24,058 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी एफएमसीजी निर्देशांक 0.4 टक्के, माहिती तंत्रज्ञान निर्देशांक 0.15 टक्के भांडवली वस्तू निर्देशांक 0.15 टक्के आणि तेल व नैसर्गिक वायू निर्देशांक 0.6 टक्क्यांनी घसरले.

बांधकाम, माध्यमे, धातू, औषध निर्मिती आणि ऊर्जा समभागांमध्ये खरेदीचा जोर दिसून आला. बीएसईचा बांधकाम आणि ऊर्जा निर्देशांकांत अनुक्रमे 0.9 टक्के व 0.2 अंकाची बळकटी आली. एनसईचा मीडिया निर्देशांक 0.6 टक्के, धातू निर्देशांक 0.3 टक्के आणि औषध निर्देशांक 0.25 टक्क्यांनी वधारले.

दिग्गज समभागांची कामगिरी

रिलायन्स इन्डस्ट्रीज, महिन्द्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, डीवीआर, कोल इन्डिया, टाटा पावर, अंबुजा सीमेंट, एनटीपीसी आण अरविंदो फार्मा हे समभाग 0.6 ते 2.5 टक्क्यांनी वधारले. तर एसबीआय, ऍक्सिस बँक, बजाज ऍटो, हीरो मोटोकॉर्प, आयसीआयसीआय, एचपीसीएल, पावर ग्रिड, भारती इन्फ्रा आणि टेक महिन्द्रा हे समभाग 0.8 ते 3 टक्क्यांपर्यंत घसरले. मिडकॅप समभागांत अदानी इंन्टरप्रायजेस, टाटा केमिकल्स, अदानी पावर, अपोलो हॉस्पिटल्स आणि बजाज होल्डिंग्स हे समभाग 2.2 ते 5.4 टक्क्यांच्या तेजीसह बंद झाले. तर स्मॉलकॅपमधील जेन टेक, सुप्रीम इन्फ्रा, हिमाद्री स्पेशल, आशापुरा माइन आणि रिलायन्स इन्डस्ट्रियल इन्फ्रा हे समभाग 10.4 ते 20 टक्क्यांनी मजबूत झाले. राय साहेब मिल्स, केडीडीएल, श्री अधिकारी ब्रदर्स, आधीनिक इन्ड्रस्ट्रीज आणि लिप्सा जेम्स हे समभाग 6.7 ते 4 टक्क्यांनी घसरले.

Related posts: