|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » देवगड येथे आकाश कंदिल स्पर्धेचे आयोजन

देवगड येथे आकाश कंदिल स्पर्धेचे आयोजन 

प्रतिनिधी / देवगड : 

येथील उमाबाई बर्वे ग्रंथालयाच्यावतीने दिवाळीनिमित्त आकाश कंदिल स्पर्धा- 2017 चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा प्राथमिक शाळा गट व खुला अशा दोन गटात घेण्यात येणार आहे.

प्राथमिक शाळा गट हा देवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीतील प्राथमिक शाळांसाठी आहे. सहभाग घेणाऱया प्राथमिक शाळांना विद्यार्थ्यांकडून दोन किंवा तीन आकाश कंदिल बनवून घ्यायचे आहेत. आकाश कंदिल बनविताना पर्यावरण पुरक साहित्याचा वापर करायचा आहे. मात्र, थर्माकोल व प्लास्टीक इ. साहित्याचा वापर करू नये. प्राथमिक शालेय गटासाठी प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांकासाठी अनुक्रमे 701 रु., 501 रु., 301 रु. व 251 रु. अशी व खुल्या गटासाठी 501 रु., 301 रु., 251 रु. व 201 रु. अशी रोख पारितोषिके व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. दोन्ही गटांनी 16 ऑक्टोबरपर्यंत आकाश कंदिल ग्रंथालयामध्ये आणून द्यायचे आहेत. 17 रोजी सकाळी 10.30 वा. या आकाश कंदिलचे प्रदर्शन स्नेहसंवर्धक मंडळाच्या सभागृहात भरविण्यात येणार आहे. याचवेळी पारितोषिक वितरण होणार आहे. इच्छूक स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन सचिव एस. एस. पाटील व संचालक सदस्य तथा सांस्कृतिक विभागप्रमुख सागर कर्णिक यांनी केले आहे.

Related posts: