|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » विविधा » संमेलनाध्यक्षपदासाठी लक्ष्मीकांत देशमुख यांचा अर्ज दाखल

संमेलनाध्यक्षपदासाठी लक्ष्मीकांत देशमुख यांचा अर्ज दाखल 

पुणे / प्रतिनिधी :

मराठवाडा ही माझी जन्मभूमी तर पुणे ही माझी कर्मभूमी असल्याने दोन्ही ठिकाणचा पाठिंबा अपेक्षित आहे. त्यामुळे निवडणूक प्रादेशिक अंगाने व्हायला नको. निवडणुकीत माझ्याकडून तरी वाद होणार नाही, अशी टिप्पणी देशमुख यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केली.

बडोदा येथे होणाऱया 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी लेखक आणि माजी प्रशासकीय अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेत परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्याकडे अर्ज सुपूर्द केला. त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी यांची स्वाक्षरी असून आश्लेषा महाजन, मनोहर सोनवणे, प्रा. मनोहर जाधव, किसनराव पवार, संदीप तापकीर हे अनुमोदक आहेत.


 माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे नाव निश्चित नसल्याने मराठवाडा साहित्य परिषदेचा तुम्हाला पाठिंबा आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, ते म्हणाले, मी पंचवीस वर्ष पुण्यात राहत आहे. त्यामुळे येथील वाचकांचा कौल महत्त्वाचा आहे. मराठवाडा ही जन्मभूमी तर पुणे ही कर्मभूमी असल्याने सर्वांचा पाठिंबा अपेक्षित आहे. मी आजपर्यंत लोकल ते ग्लोबल असे लिखाण करण्याचा  प्रयत्न केला आहे,’ असे देशमुख यांनी सांगितले. निवडणूक कशी घ्यायची हा पूर्णपणे महामंडळाचा अधिकार आहे, असेही त्यांनी नमूद केले.