|Thursday, January 17, 2019
You are here: Home » उद्योग » ‘अझाफ्रान’ला आदित्य बिर्लाची साथ

‘अझाफ्रान’ला आदित्य बिर्लाची साथ 

मोर मेगास्टोरमध्ये उपलब्ध होणार ऑरगॅनिक प्रॉडक्ट्स

प्रतिनिधी / मुंबई

अझाफ्रान या सौंदर्य प्रसाधने विक्री करणाऱया कंपनीने आदित्य बिर्ला रिटेल कंपनीसोबत हातमिळवणी केली आहे. त्यानुसार आदित्य बिर्ला कंपनीच्या मोर या मेगास्टोरमध्ये अझाफ्रानचे सर्व आधुनिक पर्सनल केयर प्रॉडक्ट उपलब्ध होणार आहेत. यामध्ये ऑरगॅनिक पर्सनल केयर प्रॉडक्ट्सची संपूर्ण रेंज देशभरातील आदित्य बिर्लाच्या सर्व 20 आऊटलेट्समध्ये उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले.

यामुळे अझाफ्रानची उत्पादने अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. अझाफ्रान इनॉर्वेशन कंपनीने 2014 मध्ये अझाफ्रान ऑरगॅनिक ब्रॅण्ड अंतर्गत ऑरगॅनिक सौंदर्य प्रसाधनांची श्रेणी बाजारात आणली होती. अहमदाबाद जवळील साणंद येथे कंपनीने स्वतःच्या शेतीत उगवलेले प्रमाणित ऑरगॅनिकपासून बनलेली ही उत्पादने रसायने आणि कीटकनाशक रहित आहेत.

देशभरात आदित्य बिर्ला रिटेल कंपनीचे 20 आऊटलेट्स आहेत. यापैकी 11 बेंगळूर, 3 हैदराबाद आणि उर्वरित नवी दिल्ली, मुंबई, गुडगाव, मैसूर आणि इंदोर येथे आहेत. दरम्यान, सध्या दक्षिण भारतात ऑरगॅनिक सौंदर्य प्रसाधनांना प्राधान्य दिले जात आहे. ग्राहकांपर्यंत उत्पादने पोहोचावेत आणि भारतीय बाजारात चांगले स्थान निर्माण करावे याकरता आदित्य बिर्ला रिटेल कंपनीसोबत करार केल्याचे अझाफ्रान इनोव्हेशनचे व्यवसाय प्रमुख टी. आर. सुरेश यांनी सांगितले.

……………

जगभरात पर्सनल केयर उद्योगात ऑरगॅनिक केयर संगमेंट जलदगतीने विकसित होत आहे. आम्ही फार्म टू फेस या संकल्पनेवर काम करीत आहोत. तयार करण्यात येणाऱया प्रॉडक्टची संपूर्ण प्रक्रिया प्रकल्पामध्येच केली जाते. त्यामुळे रसायन रहित उत्पादने ग्राहकांना देत आहोत. एलकांना एजेकिल अव्यवस्थापकीय संचालक, अझाफ्रान

Related posts: