|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » उद्योग » पतपुरवठा वाढ मोहीम अपूर्ण : भट्टाचार्य

पतपुरवठा वाढ मोहीम अपूर्ण : भट्टाचार्य 

मुंबई

भारतीय स्टेट बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य या शनिवारी निवृत्त झाल्या. बँकेकडे मागणी करण्यात येणाऱया प्रमाणात पतपुरवठा करण्यास आले नाही. यासाठी सर्वांकडून योग्य ते प्रयत्न करण्यात आले. आपले उत्तराधिकारी असणारे रजनीश कुमार यांनी अनुप्तादित कर्जाची समस्या सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. आपल्या कालावधीत बँकेची कामगिरी सुधारण्याचा प्रयत्न केले. मात्र वाढत्या पतपुरवठय़ाची मागणी पूर्ण करण्यास अपयश आल्याची खंत त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

200 वर्षे जुनी असणाऱया बँकेच्या इतिहासातील त्या पहिल्या महिला अध्यक्षा ठरल्या आहेत. 2013 मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर 2016 मध्ये एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली. मार्चमधील आकडेवारीनुसार भारताचा पतपुरवठा केवळ 5 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या 6 दशकातील सर्वात कमी वाढ झालेली दिसून आली. यानंतर आपण बँकिंग क्षेत्रात कार्यरत राहणार नसल्याचे भट्टाचार्य यांनी म्हटले. आता ही जागा रजनीश कुमार हे त्यांचे सहकारी शनिवारपासून घेतील. त्याची तीन वर्षांसाठी नियुक्त करण्यात आली.

Related posts: