|Wednesday, January 16, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

मेष

शुक्र, मंगळ व बुधाचे राश्यांतर होत आहे. या आठवडय़ात  रागावर नियंत्रण ठेवा. वाद, गैरसमज, टाळण्याचा प्रयत्न करा. नोकरीत कामाचा व्याप वाढल्याने घराकडे थोडे दुर्लक्ष होईल. प्रिय व्यक्तीबरोबर वाद घालू नका. व्यवसायात  प्रगती संभवते. शुक्रवार, शनिवार वाहन जपून चालवा. कला क्रीडा क्षेत्रात दुखापत होण्याची शक्मयता आहे. शनिच्या कामात यंत्राच्या बिघाडामुळे तारांबळ उडण्याची शक्मयता  आहे. नवीन व्यक्तीच्या भेटीगाठी संभवतात. राजकीय, सामाजिक क्षेत्रात खोटे आरोप होतील.


वृषभ

शुक्र, मंगळाचे राश्यांतर घरातील समस्या कमी करणार आहेत. जीवनसाथीबरोबरचे संबंध अजून चांगले होतील. नाटय़चित्रपट क्षेत्रात एखादी संधी मिळण्याची शक्मयता आहे. आरोग्याची थोडी काळजी घ्या. बुधाचे राश्यांतर धंद्यात थोडी मंदी आणणार आहे. फसगत संभवते.पैसा जपून खर्च करा. शेतकरीवर्गाने लवकरच कामे पूर्ण करण्याची गरज आहे. विद्यार्थीवर्गाला कष्ट घेणे गरजेचे आहे. मानसिक शारीरिक त्रास कमी होईल. प्रिय व्यक्तीच्या भेटीगाठी संभवतात.


मिथुन

कन्या राशीत  शुक्र, मंगळ, व तुळेत बुध प्रवेश करीत आहे. सोमवार, मंगळवार, संसारात किरकोळ वाद होतील. खर्च वाढेल. प्रवासात सावध रहा. दिवाळीची खरेदी करताना वेंधळेपणा करू नका. बुधवारपासून तुमच्या कार्याला गती मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात यश मिळेल. संततीची प्रगती होईल. घर, वाहन इ. खरेदीचा विचार कराल. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नोकरीत प्रमोशनचा विचार होईल. कोर्टकेसमध्ये प्रश्न वाढवू नका.


कर्क

कर्क  राशीच्या तृतीयात शुक्र, मंगळ व चतुर्थात बुध प्रवेश करीत आहे. राजकीय सामाजिक कार्यात बुधवार, गुरुवार गैरसमज होईल. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. जमिनी संबंधी व्यवहारात लक्ष द्या. प्रयत्न करा. यश मिळवता येईल. संसारात प्रेमाच्या माणसांची भेट होईल. दिवाळीची खरेदी मनाप्रमाणे वागू शकाल. वाटाघाटीचा प्रश्न निघेल. विद्यार्थ्यांनी आळस करू नये.


सिंह

सप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करून घ्या. शुक्रवार, शनिवार अडचणी येतील. खरेदी लवकर करा. स्त्रियांनी दिवाळीचा फराळ करताना गेंधळ करू नये. यावषीची दिवाळी आनंददायी असेल. कन्या राशीत शुक्र, मंगळ व तुळेत बुध प्रवेश करीत आहे. धंद्यात फायदा होईल. नवे काम मिळेल. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. शिक्षणात मोठे यश मिळवता येईल. राजकीय- सामाजिक कार्याचा विस्तार करू शकाल. लोकप्रियता मिळेल.


कन्या

तुमच्या राशीत शुक्र, मंगळ व तुळेत बुध प्रवेश करीत आहे. मागील घटनांचा विचार चांगल्या कामासाठी करा. उदास न होता कार्याचा वेग वाढवा. राजकीय, सामाजिक कार्याचा विकास मनाप्रमाणे करता येईल. लोकांच्या सोयीसाठी संस्था काढा. स्त्रियामुळे, वृद्ध यांच्यासाठी कार्य करा. आर्थिक बदल मिळू शकेल. लोकांना रेजगार द्या. तुमचा धंदा वाढेल. संसारात शुभ समाचार मिळेल. शिक्षणात पुढे जाल.


तूळ

तूळेच्या व्यवस्थानात शुक्र, मंगळ व तुमच्या राशीत बुध प्रवेश करीत आहे. तुमच्या कार्यात अडचणी येतील. जवळच्या व्यक्ती तुमच्या सुखाशी स्वत:ची तुलना करतील. खिसा पाकीट सांभाळा. दुसऱयाला मदत करण्याची घाई नको. खरेदी करताना महत्त्वाच्या वस्तू सांभाळा. गैरसमज, व वाद राजकीय, सामाजिक कार्यात होऊ शकतो. तारतम्य ठेवा. भावनेच्या भरात वाहावत जाऊ नका. शिक्षणात आळस नको. स्वयंपाक घरात सावधपणे काम करा. सोमवार, मंगळवार मनस्ताप होईल.


वृश्चिक

कन्या राशीत शुक्र, मंगळ व तुळेत बुध प्रवेश करीत आहे. बुधवार, गुरुवार धंद्यात तणाव होईल. मजूर वर्गाची कमी होईल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचा टिकाव लागेल. प्रेमाने समस्या सोडवा. दुसऱयावर एकदम विश्वास ठेवू नका. संसारात महत्त्वाची कामे करता येतील. खरेदी करताना व्यवहाराकडे लक्ष द्या. उत्साह राहील. दिवाळीचे पदार्थ याच सप्ताहात करून घ्या. शिक्षणात यशाची आशा आहे. प्रयत्न कमी होता कामा नये.


धनु

कन्या राशीत शुक्र, मंगळ व तुळेत बुध प्रवेश करीत आहे. धंद्यात प्रगतीची संधी मिळेल. परंतु अडचणींचा सामना करावा लागेल. प्रकृतीची काळजी घ्या. राजकीय सामाजिक कार्यात प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करा. संयमाने बोला. वरि÷ मदत करतील. किरकोळ गैरसमज व वाद तात्पुरते संसारात होतील. संततीच्या सुखासाठी नवी योजना सुचेल. अविवाहितांना लग्नासाठी स्थळे मिळतील. मनाची अस्थिरता वाढल्याने प्रश्न वाढेल. स्थिर रहा.


मकर

 कन्या राशीतील शुक्र मंगळ तुमचा उत्साह वाढवणार आहे. मनावरील दडपण कमी होईल. संसारात शुभ समाचार मिळेल. खरेदी होईल. बुधवार, गुरुवार सावधपणे व्यवहार करा.  धंद्यात सुधारणा होईल. राजकीय,  सामाजिक कार्यात प्रगतीचा व्यास वाढविता येईल. कोर्टकेसमध्ये आशादायक वातावरण राहिल. नोकरीत वरि÷ तुम्हाला नवे मोठे काम देतील. शिक्षणात पुढे जाता येईल. कला, क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्याचा नवा मार्ग मिळेल.


कुंभ

कुटुंबात गैरसमज व तणाव राहील. तारेवरची कसरत, संसारात व व्यवसायात करावी लागेल. प्रकृतीची काळजी घ्या. प्रवासात घाई नको. खर्च वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात किरकोळ व तात्पुरत्या वेळेसाठी वाद होईल, स्फोटक शब्द वापरू नका. आपसात द्वेsषाची भावना तुमच्या बद्दल तयार होईल. शिक्षणात अरेरावी नको. वडिलधाऱयांचा मान ठेवा. खाण्याची काळजी घ्या. खरेदी सावधपणे करा.


मीन

कन्या राशीत शुक्र, मंगळ व तुला राशीत बुध प्रवेश करीत आहे. धंद्यात मोठे काम मिळेल. युक्तीने काम करा. आर्थिक लाभ मिळेल. अरेरावी नको.प्रेमाने वागा. राजकीय, सामाजिक कार्यात योजना मार्गी लावता येतील. महत्त्वाची सर्व कामे याच आठवडय़ात करा. कोर्टकेसमध्ये सुवर्णतथ्य काढण्याचा प्रयत्न करा. शिक्षणात प्रयत्नाने यश मिळेल. चिंता करू नका. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल.

Related posts: