|Friday, November 16, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » चीनच्या सैनिकांची डोकलाममध्ये गस्त

चीनच्या सैनिकांची डोकलाममध्ये गस्त 

चीनच्या कुरापतीमुळे भारत देखील सतर्क

वृत्तसंस्था/ बीजिंग

भारतासोबतचा वाद संपुष्टात आल्यानंतर मागील एक महिन्यात डोकलाम भागातील सैनिकांच्या उपस्थितीचा चीनने बचाव केला. सार्वभौमत्वाच्या अधिकारांतर्गत आपले सैनिक डोकलाम भागात गस्त घालत असल्याचे चीनने म्हटले. डोकलाम हा भूतानचा भाग असून चीनने त्यावर दावा मांडला होता. डोकलाम सीमेनजीक रस्तेनिर्मितीचा प्रयत्न चीनने चालविला असल्याने तेथील वाद पुन्हा चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

डोकलाममध्ये कोणताही वाद नाही. चीनचे सैनिक डोंगलांगमध्ये गस्त घालत आहेत, ते आपल्या सार्वभौमत्वाच्या अधिकारांचा वापर करत असून ऐतिहासिक सीमेनुसार क्षेत्रीय सार्वभौमत्वाचे रक्षण करत असल्याचे चीनने
म्हटले.

भूतानच्या हद्दीतील भागात पीपल्स लिबरेशन आर्मीने रस्तेनिर्मितीचा प्रयत्न केल्याने 16 जूनपासून 73 दिवसांपर्यंत चीन आणि भारताच्या सैन्यादरम्यान तणावाची स्थिती होती. मागील काही दिवसात चीन या भागातील सैनिकांच्या संख्येत वाढ करत असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले. डोकलामनजीकच्या भागात सैन्यसराव आयोजित करत चीन कुरापती काढत असल्याने भारत दक्ष आहे.

गुरुवारीच भारतीय हवाईदलाचे प्रमुख बी.एस. धनोआ यांनी चिनी सैनिक चुंबी खोऱयात असल्याचे म्हणत या मुद्यावर शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढण्यात दोन्ही देशांचे हित असल्याचे वक्तव्य केले. तसेच त्यांनी पश्चिम तसेच पूर्व मोर्चावर युद्ध लढण्यास हवाईदल सज्ज असल्याचे इशारावजा वक्तव्य केले.

Related posts: