|Tuesday, April 23, 2019
You are here: Home » क्रिडा » लेविस हॅमिल्टनला पोल पोझिशन

लेविस हॅमिल्टनला पोल पोझिशन 

वृत्तसंस्था / टोकियो

येथे रविवारी होणाऱया जपान ग्रा प्रि एफ-वन मोटार शर्यतीपूर्वी शनिवारी झालेल्या सरावामध्ये मसिडीस चालक लेविस हॅमिल्टनने फेरारी चालक सेबेस्टियन व्हेट्टलला मागे टाकत पोल पोझिशन पटकाविले.

या सरावामध्ये हॅमिल्टनने 5.8 कि.मी.चे अंतर 1 मिनिट आणि 27.319 सेकंदाचा अवधी घेत जिंकत पोल पोझिशन मिळविले. हॅमिल्टनच्या वैयिक्तक रेसिंग कारकीर्दीतील हे 71 वे पोल पोझिशन आहे. हॅमिल्टनचा संघ सहकारी बोटासने दुसरे स्थान पटकाविले. हॅमिल्टनने सर्वंकष विभागात 34 गुणांसह आघाडीचे स्थान मिळविले असून 2017 च्या रेसिंग हंगामातील अद्याप पाच शर्यती बाकी आहेत. यावर्षीच्या रेसिंग हंगामात हॅमिल्टनचे हे दहावे पोल पोझिशन आहे. जपान एफ-वन शर्यतीच्या सराव सत्रात हॅमिल्टनने नवा स्पर्धा विक्रम करताना यापूर्वी सातवेळा विश्व विजेतेपद मिळविणाऱया जर्मनीच्या मायकेल शुमाकरचा विक्रम 1.6 सेकेंदाने मागे टाकला.

Related posts: