|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सायकलला धडक, स्कुटरस्वाराचा मृत्यू

सायकलला धडक, स्कुटरस्वाराचा मृत्यू 

प्रतिनिधी/ मडगाव

सेरावली येथे झालेल्या एका अपघातात एका युवकाला मृत्यू येण्याची घटना 4  ऑक्टो. रोजी घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डुंकोली-सेरावली येथील योहन पियेदाद गोम्स हा 21 वर्षीय युवक जीए-08-सी-5075 क्रमांकाच्या दुचाकीने सुरावलीहून मडगावच्या दिशेने येत होता. वाटेत या दुचाकीस्वाराची एका सायकलस्वाराला धडक बसली.

या धडकेने सायकलस्वार रस्त्याच्या बाजुला फेकला गेला व जखमी झाला तर दुचाकीस्वार गोम्स गंभीररित्या जखमी झाला. त्याला तातडीने मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात नेण्यात आले. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे बांबोळी येथील सरकारी इस्पितळात नेण्यात आले. तेथे उपचार चालू असताना योहन गोम्स याला मृत्यू आला.

कोलवा पालिसांनी भारतीय दंड सहितेच्या 279, 337 व 304-अ कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. अवघ्या 21 वर्षीय या युवकाच्या अकाली अपघाती मृत्यूमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.