|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » मनोरंजन » विदेशात हाफ तिकिटचा डंका

विदेशात हाफ तिकिटचा डंका 

लहान मुलांचं भावविश्व मोठय़ा पॅनव्हासवर मांडत दिग्दर्शक समित कक्कड यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘हाफ तिकीट’ या मराठी चित्रपटाने विदेशातही मराठीचा झेंडा फडकवला आहे. भारतीय प्रेक्षकांच्या मनावर आपला ठसा उमटवणारा ‘हाफ तिकीट’ हा चित्रपट पॅरॉसेल इंटरनॅशनल डय़ू फिल्म डे रिमोस्की  या चित्रपट महोत्सवातही कौतुकास पात्र ठरला आहे. भारतामध्ये जुलै 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हाफ तिकीट’ने प्रदर्शनानंतर प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय. त्यासोबत बऱयाच चित्रपट महोत्सवांमध्येही आपला ठसा उमटवला आहे. आज विदेशातही या चित्रपटाचा डंका वाजतोय. पॅनडामध्ये नुकत्याच पार पडलेल्या 35 व्या पॅरॉसेल इंटरनॅशनल डय़ू फिल्म डे रिमोस्कीमध्ये ‘हाफ तिकीट’ने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. हा चित्रपट महोत्सव लहान मुलांसाठी आयोजित करण्यात येतो. रिमोस्कीच्या अनेक शाळांमध्ये ‘हाफ तिकीट’ चित्रपट दाखवण्यात आला असून यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना दिग्दर्शक समित कक्कड यांनी उत्तरं दिली. या महोत्सवानंतर टोरान्टो आंतरराष्ट्रीय बालचित्रपट महोत्सवासाठी हाफ तिकिट जाणार आहे.

या चित्रपटात कक्कड यांनी मुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱया दोन लहान मुलांची मांडलेली गोष्ट लहानग्या प्रेक्षकांसोबतच मोठय़ांनाही भावली. या शोला समित कक्कडही उपस्थित होते. त्यांनी प्रेक्षक तसेच तिथल्या चित्रपट जाणकारांशी संवाद साधत या चित्रपटामागील भूमिका स्पष्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱया शुभम मोरे आणि विनायक पोतदार या बालकलाकारांच्या अभिनयाचं सर्वांनीच भरभरून कौतुक केलं. याशिवाय ‘हाफ तिकीट’च्या यशस्वी दिग्दर्शनाबद्दल यांचं अभिनंदनही केलं. व्हिडिओ पॅलेसची निर्मिती असलेल्या या चित्रपटात समित कक्कड यांनी जगण्याचा संघर्ष व स्वप्नांचा पाठलाग करण्याचा ध्यास याचा अचूक मेळ साधत दोन लहानग्यांची धडपड सादर केली आहे. या चित्रपटात भाऊ कदम, प्रियांका बोस, उषा नाईक, शशांक शेंडे, जयवंत वाडकर, कैलाश वाघमारे आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. ‘काक मुत्ताई’ या दाक्षिणात्य चित्रपटाचे अधिकृत रूपांतरण असलेल्या ‘हाफ तिकीट’ या सिनेमाने आजवर बऱयाच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल्समध्ये बाजी मारली आहे.

Related posts: