|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » क्रिडा » गुजरात फॉर्च्युनचा विजयी धडाका कायम

गुजरात फॉर्च्युनचा विजयी धडाका कायम 

वृत्तसंस्था/जयपूर

प्रो कबड्डी लीगमधील रविवारी झालेल्या लढतीत बलाढय़ गुजरात फॉर्च्युनने विजयी धडाका कायम ठेवताना पटना पायरेट्सवर 33-29 फरकाने विजय मिळवला. या शानदार विजयासह गुणतालिकेत अ गटात 77 गुणासह गुजरातने अग्रस्थान कायम राखले आहे. पटना संघ ब गटात 67 गुणासह दुसऱया स्थानी आहे.

सामन्याच्या प्रारंभी, सचिन व सुनील कुमार यांनी धडाक्यात प्रारंभ करताना संघाला 10-7 अशी आघाडी मिळवून दिली होती. ही आघाडी कायम ठेवत गुजरातने पहिल्या सत्रात 18-12 असे वर्चस्व राखले होते. दुसऱया सत्रात मात्र पटना संघाने गुजरातला चांगलीच टक्कर दिली. पटना संघाच्या मोनु गयात व विजय यांनी सहा गुण मिळवत संघाची आघाडी 27-22 अशी कमी केली होती. अखेरच्या सत्रात मात्र गुजरातच्या महेंद्र रजपूतने आक्रमक चढाई करत 33-29 असे संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पटना संघाच्या बचावफळीला दुसऱया सत्रात अपेक्षित कामगिरी करता आली नाही. मोनु गयात व विशाल वगळता इतर चढाईपटूंनी निराशा केल्यामुळे पटना संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

गुजराततर्फे महेंद्र रजपूतने 6, सचिनने 5 तर सुनील कुमार व अबुफजर यांनी चार गुण मिळवले. पटना संघातर्फे मोनु गयात व विजय यांनी प्रत्येकी 6 गुणाची कमाई केली. प्रदीप नरवालने 4 गुण मिळवले.

Related posts: