|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » सीसीटीव्हीच्या मदतीने महिलेची पर्स आढळली

सीसीटीव्हीच्या मदतीने महिलेची पर्स आढळली 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

sयेथील रेल्वे स्टेशनमध्ये दररोज शेकडो प्रवाशांची वर्दळ सुरू असते. अशावेळी काही प्रवाशांकडून वस्तू विसरून जाणे किंवा हरवणे अशा घटना घडत असतात. अशावेळी रत्नागिरी रेल्वे पोलीस सतर्क राहून आपली कामगिरी बजावत असते. नुकतीच एक महिला प्रवासीची पर्स रेल्वे स्थानकाच्या परिसरात पडली होती. त्या पर्समध्ये रोकड व इतर मौल्यवान वस्तू होत्या. याची खबर मिळताच रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्हीची मदत घेवून फुटेज पाहिले. त्यावेळी स्थानकात पर्स पडलेली आढळली. रेल्वे पोलिसांनी त्वरित ही पर्स शोधून संबंधित महिलेला ही पर्स सुपूर्द केली.

शकीरा वसीम मुकादम या आपल्या कुटुंबियासमवेत मुंबईला निघाल्या होत्या, यावेळी रिक्षातून उतरल्यावर त्यांची पर्स स्थानकाच्या सारस्वत एटीएमच्याजवळ पडली होती. ही बाब मुकादम यांच्या लक्षात आली नाही. जेव्हा रेल्वेत बसायला गेल्या त्यावेळी त्यांना आपली पर्स सोबत नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी त्वरित रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. यावेळी पोलीस निरीक्षक अजित मदाळे व त्यांचे सहकारी विशाल पी. आणि रवीकुमार यांनी ही पर्स शोधण्यासाठी आधी सीसीटीव्हीची मदत घेतली. ज्यावेळी मुकादम रेल्वेस्थानकात आल्या. त्यावेळचे फुटेज तपासण्यात आले. त्यानंतर रेल्वे परिसरात काही दिसत आहे का? याची शहानिशा करण्यात आली. यावेळी त्यांना या एटीएमशेजारी पर्स आढळून आली.

अजित मदाळे यांनी ही पर्स संबंधित महिला शकीरा मुकादम यांचीच आहे ना? याची खात्री केली. यामध्ये सोनसाखळी, 500 रूपये रोकड, काही कागदपत्रे वगैरे होती. मुकादम यांना ही पर्स सुपूर्द करण्यात आली. यापूर्वीही रेल्वे पोलिसांनी अनेकांना अशा प्रकारे त्वरित सहकार्य करून आपले कर्तव्य चोखपणे पार पाडले।।।।।।।।।।,