|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » केळीनी उसगाव येथे अपघातात युवक ठार

केळीनी उसगाव येथे अपघातात युवक ठार 

प्रतिनिधी/ फोंडा

केळीनी-उसगाव येथे दुचाकीच्या झालेल्या अपघातात युवकाचा उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. नेहाल गावडे (वय.24, रा. अंतर्शे-पाळी) असे त्याचे नाव आहे. काल रविवारी सायंकाळी 7.15 वा. हा अपघात घडला.

फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नेहाल हा आपल्या यामाहा एफझी जीए 05 एम 3057 या दुचाकीने उसगाव वडाकडेहून उसगाव तिस्क या दिशेने जात होता. केळीनी येथे पोहोचला असता त्याच्या मार्गात अचानक रस्त्यावर कुत्रा आडवा आला. त्याचा गाडीवरील ताबा गेला. तशीच गाडी सावरण्याच्या प्रयत्नात असताना रस्त्याच्या बाजूला पार्क करून ठेवलेल्या टिप्पर ट्रक जीए 03 टी 5109च्या पाठीमागे धडक दिली. धडक एवढी जबरदस्त होती की दुचाकीसह तो ट्रकाच्या मागील भागात घुसला व गंभीर जखमी होऊन अत्यवस्थ झाला. फोंडा पोलिसानी घटनास्थळी धाव त्याला उसगाव येथील उप आरोग्य पेंद्रात दाखल केले. त्यानंतर त्याला बांबोळी येथे गोमेकॉत नेण्यात आले असता वाटेतच त्याचा मृत्यू झाल्याचे गोमेकॉतील डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी फोंडा पोलीस स्थानकाचे हवालदार विनोद साळुंके यानी पंचनामा केला.

 

Related posts: