|Thursday, June 20, 2019
You are here: Home » leadingnews » 3 हजार 131 ग्रामपंचायतींच्या निवडणूकींचे आज निकाल

3 हजार 131 ग्रामपंचायतींच्या निवडणूकींचे आज निकाल 

ऑनलाईन टीम / मुंबई :

महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमधील  3 हजार 131 ग्रामपंचायतींच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाची आज मतमोजणी होणार आहे. पहिल्यांदाच थेट लोकांमधून सरपंच निवडला जाणार असल्याने याबाबतची अत्सुकता वाढली आहे.

8 ऑक्टोबरला पहिल्या टप्प्यात सरासरी 79 टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयूक्त ज.स. सहारिया यांनी दिली. नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, नांदेड,परभणी,जालना, लातूर, हिंगोली, आकोला, यवतमाळ, वाशिम, बुलडाण या जिलह्यांमधील एकूण 3131 जागांसाठी मतदान घेण्यात आले होते. नगरपालिकांप्रमाणेच पहिल्यांदाच सरपंचपदासाठी थेट निवडणूक होणार असल्याने चुरस वाढली आहे. विशेषतः याचा फायदा भाजपाला होईल अशी अटकळ बांधली जात आहे. त्यामुळे आजच्या ग्रामपंचायतीच्या निकालाकडे सगळय़ांचे लक्ष लागले आहे.